‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट आणखी…” नागराज मंजुळेंनी केला मोठा खुलासा

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 05T131235.222

Nagraj Manjule New Marathi Movie : नेहमी हटके चित्रपट बनवणारा नागराज मंजुळेंचा (Nagraj Manjule) ‘घर बंदूक बिरयानी’ (Ghar Banduk Biryani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाची नागराजच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. आता लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत नागराज यांनी घर बंदूक बिरयानी या चित्रपटाविषयी भाष्य केलं आहे.

हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांनी मोठा परिश्रम घेतला आहे. यामध्ये अनेक जिन्नस वापरले जातात, ज्याची प्रत्येकाची एक खासियत असते. तशीच खासियत असलेले महाराष्ट्रामधील कलाकार ‘घर बंदूक बिरयानी’ मध्ये दिसणार आहेत. ‘घर बंदूक बिरयानी’ या सिनेमात कलाकारांविषयी सांगताना नागराज मंजुळे म्हणाले,”घर बंदूक बिरयानी’ या सिनेमातील सर्वच कलाकार खूप मेहनत घेतली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nagraj Popatrao Manjule (@nagraj_manjule)


महाराष्ट्राच्या अनेक भागामधील हे कलाकार असल्याने प्रत्येक कलाकाराची एक वेगळी शैली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, यामुळे ही बिर्याणी खूपच चविष्ट आहे.नागराजच्या ‘घर बंदूक बिरयानी’ या सिनेमाची प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहेच. पण आता ‘फ्रेम’ या सिनेमाची देखील चाहते आतुरतेने वाट बघत आहे. नागराज आणि अमेय वाघची जोडी काय धुमाकूळ घालणार याकडे मोठं लक्ष लागलं आहे. या सिनेमात देखील चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

‘सर्किट’ मध्ये मिलिंद शिंदेंचा खलनायकी अंदाज

‘घर बंदूक बिरयानी’ सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यान लेट्सअपला दिलेल्या मुलाखतीत नागराज मंजुळे म्हणाले,”झुंड’, ‘घर बंदूक बिरयानी’ नंतर अशा आणखी एका मराठी सिनेमात झळकणार आहे. ‘फ्रेम’ असं या सिनेमाचे नाव असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितल आहे. या सिनेमात अमेय वाघबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आजवर अनेक सिनेमामध्ये त्यांनी छोटी- मोठी भूमिका साकारली आहेत. पण एक दिग्दर्शक- निर्माता हे जास्त चांगलं असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 7 एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags

follow us