एआय परफॉर्मन्सना नो एन्ट्री! ऑस्कर्सच्या नियमांमध्ये तीन मोठे बदल भारताला काय फायदा होणार?
Oscars जगभरातील कला विश्वातील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या ऑस्कर्स पुरस्काराबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे.
No entry for AI performances How will India benefit from three major changes in Oscars rules : जगभरातील कला विश्वातील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणाऱ्या ऑस्कर्स पुरस्काराबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. कारण यावेळी ऑस्कर्समध्ये वन बॅटल आफ्टर अनदर आणि सिनर्स यासारख्या चित्रपटांचा धमाका पाहायला मिळणार आहे. या दोन्हीही चित्रपटांना सर्वात जास्त कॅटेगरीमध्ये सन्मानित करण्यात येणार आहे. मात्र 2027 पासून ऑस्कर्समध्ये काही बदल करण्यात येणार आहेत. हा प्रतिष्ठित पुरस्कार सुरू होऊन जवळपास एक शतकाचा काळ झाला आहे. मात्र आता आयोजकांनी यामध्ये एक नवीन बदल केला आहे.
‘राजा शिवाजी’ ने रचला इतिहास! पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला
ऑस्करच्या काही खास कॅटेगरीमध्ये बदल करण्यात आले आहे. काही नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. यामुळे कलाकारांना त्यांच्या कामाची पावती मिळेल. जे कडक नियमांमुळे ते वंचित राहत होते. पाहूयात हे कोणते तीन मोठे बदल आहेत जे ऑस्कर्समध्ये केले जाणार आहे ? त्याचा भारताला काय फायदा होणार?
ऑस्कर्समध्ये कोणते तीन मोठे बदल?
ऑस्कर्सच्या नियमांमध्ये मोठा बदल हा आहे की, आता कोणताही अभिनेता एका कॅटेगरीमध्ये एक होऊन अधिक वेळा नॉमिनेट केला जाऊ शकतो. अगोदर ही सुविधा नव्हती. पूर्वी एका कलाकाराला एका कॅटेगिरीमध्ये फक्त एक वेळा नॉमिनेट केलं जात होतं. मात्र आता दोन वेळा देखील त्याला नॉमिनेट केलं जाऊ शकतं. म्हणजे एखाद्या अभिनेत्याचे एका वर्षी दोन बेस्ट परफॉर्मन्स आहेत आणि दोन्हींना देखील चांगले वोट मिळालेले आहेत. तर त्याला विशिष्ट कॅटेगिरीमध्ये दोन्ही चित्रपटांसाठी नॉमिनेशन मिळू शकतं.
पुणे पोलिस दलात खळबळ… महिला API ला 28 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले…
दुसरा नियम हा टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. आजकाल चित्रपटांमध्ये अनेक वेळा एआयचा वापर केला जात आहे. एआयचा वापर शक्यतो काही आगाऊ गोष्टी किंवा एखादी कमतरता पूर्ण करण्यासाठी केला जातो. पूर्वी अशा परफॉर्मन्सला देखील ऑस्करमध्ये अवॉर्डसाठी सहभागी करून घेतलं जात होतं. मात्र आता नव्या नियमानुसार हे होणार नाही. एआय एन्फ्लुएन्स्ड अभिनेते आणि लेखक किंवा एखादा परफॉर्मन्स कितीही उत्कृष्ट असला तरी देखील त्याला ऑस्करच्या कॅटेगरीमध्ये नॉमिनेट केलं जाणार नाही.
शंभर एकरावर मंडप, मंत्री, राजकीय मंडळींना निमंत्रण; इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही लग्नसोहळा
तर तिसरा नियम आहे तो म्हणजे बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म कॅटेगिरीमध्ये बदल करण्यात आले आहे. यानुसार कोणताही देश त्यांच्या ऑफिशियल सिलेक्शन कमिटीकडून एक पेक्षा जास्त चित्रपटांना ऑस्कर्समध्ये सबमिशनसाठी पाठवू शकतो. या अगोदर कोणत्याही देशाकडून एकच चित्रपट ऑस्करसाठी सबमिट करता येत होता. मात्र आता दोन चित्रपटांना देखील एकच कॅटेगिरीमध्ये नॉमिनेशनसाठी सबमिट केलं जाऊ शकतं. जर असं झालं तर भारतासाठी ही आनंदाची बातमी असेल.
2027 चा ऑस्कर्स केव्हा सुरू होणार?
ऑस्कर्स 2027 बद्दल सांगायचं झालं तर या सोहळ्यामध्ये होणारे बदल 99 संस्काराने सुरू होतील. पुढच्या वर्षी 14 मार्च 2027 ला ऑस्कर्स सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ऑस्करचा इतिहास अत्यंत जुना आहे. लवकरच हा पुरस्कार त्याचे शंभर वर्ष पूर्ण करणार आहे. या पार्श्वभूमीवर कलेला प्रोत्साहन देण्यासाठी ऑस्कर्सने हे काही बदल केले आहेत. हे बदल पुढच्या वर्षी म्हणजे 2017 पासून लागू होतील.