Shah Rukh Khan: पाकिस्तानी अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाली, “किंग खानला अभिनय येत नाही”

Shah Rukh Khan: पाकिस्तानी अभिनेत्रीचं खळबळजनक वक्तव्य; म्हणाली, “किंग खानला अभिनय येत नाही”

Pakistani Actress Mahnoor Baloch statement: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच सर्व चाहत्यांचा लाडका किंग खान (King Khan) फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात त्याने नाव कमावलं आहे. जगभरात त्याचा मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे. चाहते त्याला त्यांचा देव देखील मानत असतात. तसेच सोशल मीडियावर (social media) त्याचे अनेक फॅनपेज आहेत. किंग खानबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर त्याचे चाहते नाराज होत असताना देखील आपण पाहिलं आहे. आता पाकिस्तानी अभिनेत्री महनूर बलोचने (Mahnoor Baloch) किंग खानबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानी अभिनेत्री महनूर बलोचने ‘हद करदी’ या पाकिस्तानी कार्यक्रमामध्ये किंग खानबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे. महनूर म्हणाली आहे की,” शाहरुख म्हणजेच किंग खानला अभिनय येत नाही. तो एक उत्तम व्यावसायिक आहे. स्वत:चं मार्केटिंग कसं करायचं हे त्याला माहिती आहे. महनूर पुढे म्हणाली आहे की, “किंग खानचं व्यक्तिमत्त्व चांगलं असलं तरी तो आजिबात देखणा नाही. केवळ व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर तो त्याच्या चाहत्यांना चांगला दिसतो. अनेक सेलिब्रिंटीकडे सौंदर्य आहे परंतु तो ओरा नाही.

किंग खानच्या चाहत्यांनी त्याच्या नकारात्मक विषयाकडे दुर्लक्ष केले आहेत. तसेच किंग खानला आजिबात अभिनय येत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. तो एक चांगला उद्योगपती असल्याने स्वत:चं मार्केटिंग कसं करावं हे त्याला चांगलंच माहिती आहे. व्यक्तिमत्त्व चांगलं असल्याने तो त्या गोष्टीचं चांगलच मार्केटिंग करत असतो. अनेक चांगल्या दर्जाचे अभिनेते आहेत. परंतु अद्याप ते पुढे येऊ शकले नाहीत. महनूरच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे किंग खानच्या चाहत्यांचा राग अनावर झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते महनूरवर जोरदार टीका करत असल्याचे दिसून येत आहेत.

कथा महाराष्ट्राच्या राजकारणाची अन् षडयंत्र-कट-कारस्थानाची; शरद पवार येणार मोठ्या पडद्यावर

किंग खानबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया दिल्याने आपण लोकप्रिय होऊ असं महनूरला वाटल्याने तिने असं खळबळजनक वक्तव्य केल्याचा अंदाज बांधला जात आहे. सुपरस्टार किंग खानचा मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या ३ दशकांपासून तो चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. नुकताच त्याचा ‘पठाण’ हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त गल्ला कमावला आहे. आता त्याचा ‘जवान’ हा सिनेमा 7 सप्टेंबरला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो नयनताराबरोबर स्क्रीन शेअर करत असल्याचे दिसून आला आहे. तसेच त्याचे ‘डंकी’ आणि ‘टायगर 3’ हे सिनेमे चाहत्यांच्या भेटीला लवकरच येणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube