Adipurush : प्रभासच्या ‘आदिपुरुष’चा महाविक्रम; रिलीजआधीच केली 432 कोटींची कमाई

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 29T104731.213

Prabhas kriti Sanon Adipurush Movie : प्रभास (Prabhas) आणि बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननचा (Kriti Sanon) ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा आता चाहत्यांचया भेटीला लवकरच येणार आहे. 16 जून 2023 रोजी हा बहुचर्चित सिनेमा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. पण आता रिलीजअगोदरच या सिनेमाने ४३२ कोटींची मोठी कमाई केल्याची माहिती मिळाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)


मिळालेल्या माहितीनुसार, ‘आदिपुरुष’ या सिनेमाने रिलीज होण्याअगोदरच ४३२ कोटींचा मोठा गल्ला कमावला आहे. थिएट्रिकल राइट्स, सॅटेलाइट राइट्स, म्यूझिक राइट्स, डिजिटल राइट्स अशा अनेक गोष्टींमधून या सिनेमाने रिलीज होण्याआधीच चांगलीच मोठी कमाई केली आहे. 500 कोटींच्या बजेटमध्ये ‘आदिपुरुष’ सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आता ६८ कोटी रुपयांची कमाई केल्यास या सिनेमाचे बजेट पूर्ण होणार आहे.

प्रभास आणि कृती सेननचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा १६ जूनला चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा रिलीज होण्याअगोदर पहिल्या दिवशी किती कमाई करणार याचे अनेक अंदाज बांधले जात आहेत. पण रिलीजच्या पहिल्या दिवशी हा सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)


हिंदी, तामिळ, तेलुगू आणि मल्याळम सिनेचाहत्यांच्या ‘आदिपुरुष’ या सिनेमाला मोठा प्रतिसाद मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. देशभरातील सिनेप्रेमी या सिनेमाची मोठी प्रतीक्षा करत आहेत. प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा रामायणावर आधारित आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून सिनेमावर टीका होत आहे. पण तरीही देशभरातील सिनेप्रेमींना या सिनेमाची उत्सुकता आहे. या सिनेमातील गाणी चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरली आहेत.

Marriage : अभिनेत्री स्वरा भास्कर अडकली विवाह बंधनात

‘आदिपुरुष’ या सिनेमा प्रभास रामाच्या तर कृती सेनन सीता मातेच्या भूमिकेमध्ये दसून येणार आहे. मराठमोळ्या ओम राऊतने (Om Raut) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सैफ अली खान देखील (Saif Ali Khan) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेमध्ये झळकणार आहे. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला कमवणार याकडे सर्वाचं लक्ष लागले आहे. मराठी मनोरंजनसृष्टी गाजवणारा देवदत्त नागे देखील या सिनेमामध्ये महत्त्वाच्या भूमिकेत आहे. या बहुचर्चित सिनेमातील ‘राम सिया राम’ आणि ‘जय श्री राम’ ही दोन गाणी चाहत्यांच्या भेटीला आली आहेत.

Tags

follow us