‘Poject K’ नव्हे ‘Kalki 2898 AD’ नव्या विश्वात घेऊन जाणारा प्रभासच्या आगामी सिनेमाचा टीझर प्रदर्शित! 

‘Poject K’ नव्हे ‘Kalki 2898 AD’ नव्या विश्वात घेऊन जाणारा प्रभासच्या आगामी सिनेमाचा टीझर प्रदर्शित! 

K Title And Teaser Released : साऊथ सुपरस्टार प्रभासच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ या सिनेमाचे शीर्षक समोर आले आहे. यूएसमध्ये चालू असलेल्या सॅन दिएगो कॉमिक-कॉन (SDCC) मध्ये जोरदार धूमधडाक्यामध्ये या सिनेमाच्या अधिकृत शीर्षकाची घोषणा करण्यात आल्याची नमाहिती मिळाली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या आगामी सिनेमामुळे कायमच चर्चेत येत आहे. ‘प्रोजेक्ट के’ (Project K) या सिनेमाचे नाव आता बदलण्यात आले आहे. ‘कल्की 2898 AD’ असे यावेळी ठेवण्यात आले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vyjayanthi Movies (@vyjayanthimovies)


या सिनेमाचे नाव जाहीर करत असताना या बहुचर्चित ट्रेलर देखील  चाहत्यांच्या भेटीला आला आहे.  ‘कल्की 2898 AD’चा (Kalki 2898 AD) टीझर बघून चाहत्यांना देखील मोठी उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे. या टीझरमध्ये प्रभासचा अॅक्शन मोड बघायला मिळाला आहे. या सिनेमातील दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) लूक देखील बघण्यासारखा आहे. तसेच बॉलिवूड महानायक बिग बी यांचा देखील एक आगळा वेगळा अंदाज बघायला मिळाला आहे.

‘कल्की 2898 AD’चा टीझर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.सध्या या टीझरला लाखो व्ह्यूज मिळाल्याचे दिसून येत आहे. टीझर बघताच चाहत्यांनी सिनेमा ब्लॉकबस्टर होणार हे जाहीर करण्यात आले आहे. टीझरला लाईक्स आणि कमेंट्स करत ते चाहते आपली पसंती दर्शवत असल्याचे दिसून येत आहेत. या टीझरमध्ये बिग बी आणि दीपिका पदुकोण यांचा फर्स्ट लूक दमदार दिसत असतानाच प्रभासने  त्यामध्ये हटके एन्ट्री मारल्याचे दिसून येत आहे.

Fauj Movie: मराठा सैन्याची शौर्यगाथा सांगणार ‘फौज’ द मराठा बटालियन; जाणून घ्या सिनेमाबद्दल…

प्रोजेक्ट के आता कल्की 2898 एडी, असं म्हणत प्रभासने देखील टीझर शेअर केला आहे. ‘कल्की 2898 AD’चा टीझर बघून या सिनेमामध्ये चाहत्यांना अॅक्शन बघायला मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. प्रभासचा पहिल्यांदा असा वेगळा अंदाज बघायला मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात येत आहे. १२ जानेवारी 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

टीझरने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे. कल्की 2898 AD’ या सिनेमात प्रभास (Prabhas) आणि दीपिका पादुकोणसह बिग बी (Amitabh Bachchan), कमल हासन आणि दिशा पटानी मुख्य भूमिकेमध्ये असल्याचे दिसून येणार आहेत. कमल हासन या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. या तगडी स्टारकास्ट असलेल्या सिनेमाची चाहत्यांना देखील मोठी उत्सुकता लागली आहे. नाग अश्विनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube