Pushpa 2 Teaser Out: तुरुंगातून फरार झालेला पुष्पा कुठं गेलाय? पाहा पुष्पा-2चा नवा टीझर

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 07T182318.162

Pushpa 2: साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा (Pushpa: The Rise – Part 1) या चित्रपटाने केवळ भारतातच नाही तर जगभरात चाहत्यांची मने जिंकली आहेत. (Pushpa 2 Teaser Out) पुष्पा चित्रपटात श्रीवल्ली आणि पुष्पाची केमिस्ट्री, या चित्रपटामधील गाणी, अॅक्शन सिन्स या सर्वांना चाहत्यांची मने जिंकली. आता पुष्पाः2 (Pushpa 2) चित्रपटाचा एक व्हिडीओ चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केला आहे.

या व्हिडीओत अल्लू अर्जुन हा खास लूकमध्ये दिसून येत आहे. टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर पुष्पा-2 या चित्रपटाचा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. या व्हिडीओ सुरु होण्याच्या अगोदरच एक वृत्तनिवेदक पुष्पाबद्दल माहिती देत असताना दिसून येत आहे. तो म्हणतो, ‘तिरुपती तुरुंगातून पुष्पा फरार झाला आहे.’ तर दुसरी न्युज अँकर म्हणत आहे.

‘पुष्पाला पकडण्याकरिता पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या’ आता तुरुंगामधून फरार झालेला पुष्पा हा कुठे गेला आहे? असा सवाल सर्वांना पडलेला आहे. पण याचं उत्तर या व्हिडीओच्या शेवटला आपल्याला समजणार आहे. पुष्पा हा तुरुंगातून फरार होऊन जंगलामध्ये जातो. एका कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये पुष्पाची झलक चाहत्यांना दिसणार आहे.

टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलेल्या पुष्पा-2 चित्रपटाच्या या व्हिडीओमध्ये अल्लू अर्जुन ‘अब रुल पुष्पा का’ हा डायलॉग म्हणत असल्याचा दिसून येत आहे.

Akanksha Dubey Suicide Case : अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या मृत्यूप्रकरणी ‘या’ गायकाला अटक

‘पुष्पा-2’ मध्ये ‘हे’ कलाकार साकारणार भूमिका?

पुष्पा-2 मध्ये काही बॉलिवूडमधील कलाकार देखील काम करणार आहेत, असं सांगितले जात आहे. या चित्रपटात सलमान खान आणि अजय देवगण हे महत्वाची भूमिका साकारणार असल्याचे सांगितले जात आहे. पुष्पा द राइज (Pushpa: The Rise – Part 1) हा चित्रपट २०२१ मध्ये चाहत्यांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला.

Apurva Nemlekar: अपूर्वाचा अनोखा अंदाज, ‘रावरंभा’ चित्रपटात ‘शाहीन आपा’च्या भूमिकेत

आता अल्लू अर्जुनचे चाहते पुष्पाः2 म्हणजेच पुष्पा द रुल (Pushpa: The Rule) या चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट बघत आहेत. पुष्पा चित्रपटाच्या पहिल्या भागात अल्लु अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल, जगदीश, अजय घोष, सुनील आणि अनसूया या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटात श्रीवल्ली, सामी सामी, ओ अंटवा या गाण्यांना चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube