राशी अन् विक्रांत ‘आगामी’ सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात करण्यासाठी थेट नवरात्री उत्सवात पोहचले

राशी अन् विक्रांत ‘आगामी’ सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात करण्यासाठी थेट नवरात्री उत्सवात पोहचले

The Sabarmati Report Promotion: राशी खन्ना (Raashi Khanna) आणि विक्रांत मॅसी (Vikrant Massey) त्यांच्या आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ (The Sabarmati Report) या चित्रपटासाठी सज्ज होताना दिसतात आणि म्हणून अभिनेत्रीने नवरात्री मध्ये विक्रांतसोबत चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात केली आहे. (Navratri Festival) देवीच्या आशर्वादाने त्यांनी प्रमोशन ला जोरदार सुरुवात केली आहे ‘द साबरमती रिपोर्ट’ मध्ये (The Sabarmati Report) संपूर्ण भारतातील तरुण स्टारने एका समर्पित रिपोर्टरची भूमिका साकारली आहे, जी 27 फेब्रुवारी 2002 रोजी गोध्राजवळ साबरमती एक्स्प्रेसच्या दुःखद घटनेमागील रहस्ये उलगडते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raashii Khanna (@raashiikhanna)


‘द साबरमती रिपोर्ट’ च्या निर्मात्यांनी अलीकडेच चित्रपटाची बहुप्रतीक्षित रिलीज तारीख, 15 नोव्हेंबर, 2024 जाहीर केली. त्यांनी चित्रपटाच्या आकर्षक कथानकाची झलक दाखवत, अगदी नवीन पोस्टरचे अनावरण केले. रंजन चंदेल दिग्दर्शित या आधी रिलीज झालेल्या ट्रेलरने चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. राशी खन्नाच्या एका रिपोर्टरच्या तीव्र चित्रणामुळे लोकांमध्ये उत्सुकता वाढली आहे, जे या अभिनेत्रीला आणखी एक महत्त्वपूर्ण भूमिका बघण्यासाठी उत्सुक आहेत.

पुढे पाहताराशी खन्ना लवकरच रिलीज होणाऱ्या ‘तलाखों में एक’ मध्ये विक्रांत मॅसीसोबत पुन्हा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तिच्याकडे ‘तेलुसू काडा’ नावाचा तेलगू चित्रपट देखील आहे.

राशी खन्ना अन् विक्रांत मॅसी स्टारर The Sabarmati Report ची नवी रिलीज डेट समोर

निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर केले रिलीज

चित्रपटाच्या निर्मात्यांनी नवीन पोस्टर शेअर करून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हे नवं पोस्टर पोस्ट केले आहे. आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ज्वलंत सत्य 15 नोव्हेंबरला समोर येईल! सोबत रहा! ‘द साबरमती रिपोर्ट’ फक्त सिनेमागृहात!” असे लिहून चित्रपटाच्या नव्या आणि पहिल्या पोस्टर झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. रंजन चंदेल दिग्दर्शित हे गुजरातमधील गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ 27 फेब्रुवारी 2002 रोजी सकाळी साबरमती एक्स्प्रेसमध्ये घडलेल्या घटनेचे तपशीलवार आधारित असून याआधी रिलीज झालेल्या ट्रेलरने राशी आणि विक्रांत भूमिका कशी प्रभावी असणार आहे याची एक झलक दिली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube