Rashi Khanna: अभिनेत्रीने ‘अरनमानाई 4’ मधील गाण्यासाठी अशी केली मेहनत, म्हणाली…
Aranmanai 4 Achacho Song: राशी खन्ना (Rashi Khanna) हे नाव सध्या सोशल मीडियावर (social media) सातत्याने चर्चेत येत आहे. (Farzi) या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारुन तिने तुफान लोकप्रियता मिळवली. सध्या राशी तिच्या आगामी तमिळ चित्रपट ‘अरनमनाई 4’ मधील (Aranmanai 4) ‘अचाचो’ (Achacho Song) गाण्यात तिच्या लुकसह सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
“योद्धा” फेम अभिनेत्रीने या गाण्यासाठी खास मेहनत देखील घेतली आहे. टोन्ड बॉडी करण्यासाठी राशीने खास डाएट देखील फॉलो केल्याचं सांगितलं आहे. फिटनेसचा कोणताही ‘शॉर्टकट’ नसतो यावर जोर देऊन राशी म्हणाली ” मी या गाण्यासाठी खास कष्ट घेतेले आहेत. 12 ते 16 तासांच्या शूटिंगच्या दिवसातही मी माझ्या वर्कआउटसाठी वेळ काढते. रोज नियमित व्यायाम करून डाएट पाळून मी या गाण्यासाठी तयार झाली आहे. अगदी रविवारच्या चीट डेसाठी सुद्धा निरोगी आहार ठेवून मी या गाण्यासाठी टोन्ड बॉडी मिळवण्यासाठी मेहनत घेतली आहे.
Tamanna Bhatia ठरतेय दिग्दर्शकांची फर्स्ट चॉईस; ‘या’ दिग्दर्शकांनी दिली संधी
तिच्या कमाबद्दलच्या या गोष्टीचं सध्या सर्वत्र तोंडभरून कौतुक करावं तितकं कमीच आहे. याआधी ‘मद्रास कॅफे’ आणि ‘योद्धा’ सारख्या चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयासाठी प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळवणारी ही अभिनेत्री हॉरर-कॉमेडी ‘अरनमानाई 4’ मध्ये कमालीची भूमिका साकारणार आहे.
राशी आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ मध्ये ती विक्रांत मॅसीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. दोन्ही कलाकार पत्रकारांच्या भूमिकेत दिसणारा हा चित्रपट 2 ऑगस्ट, 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमा, वेबसीरिजमध्ये झळकलेली राशी लवकरच ‘TME’ आणि तेलुगु चित्रपट ‘तेलुसू काडा’ झळकणार आहे. तसंच ती अरनमानई 4 , तेलुसू काडा या दाक्षिणात्य सिनेमातही झळकणार आहे.