Rajkumar Rao च्या श्रीकांतची दमदार सुरूवात; पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई

Rajkumar Rao च्या श्रीकांतची दमदार सुरूवात; पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई

Raikumar Rao film Shrikanth huge earnings on first day : अभिनेता राजकुमार राव ( Rajkummar Rao ) हा वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. आता त्याचा ‘श्रीकांत’ ( Shrikanth )हा चित्रपट रिलीज झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दमदार कामगिरी केली आहे. पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ₹ 2.41 CR गोळा केले!

चौथ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या! वाचा, प्रमुख लढती अन् कुठं होणार मतदान

राजकुमारने साकारलेल्या अंध भूमिकेचं प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक होत आहे. त्याच्या या चित्रपटातील सर्वात पॉवर-पॅक परफॉर्मरने पुन्हा सिद्ध केले आहे की, तो चित्रपट उद्योगातील सर्वात अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहे. अंध उद्योगपती श्रीकांत बोल्लाच्या भूमिकेत असलेल्या राजकुमार रावच सर्वत्र कौतुक होताना दिसतंय.

मशिदीतून फतवे निघत आहेत; राज ठाकरेंनंतर फडणवीसांचाही आरोप

अनेकांनी राजकुमार राव ने श्रीकांत उभेऊभ साकारला आहे असं देखील म्हटलं आहे.तुषार हिरानंदानी दिग्दर्शनात राजकुमार राव यांनी उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांची निर्दोष भूमिका साकारणे हे त्यांच्या अतूट अभिनय कौशल्याचा पुरावा आहे. तो आउट-ऑफ-द-बॉक्स आणि मनोरंजक स्क्रिप्टसाठी पहिली पसंती का आहे हे देखील दाखवून जातो.

राजकुमार राव यांनी पडद्यावर वास्तविक जीवनातील व्यक्तिरेखा साकारण्याची ही पहिलीच वेळ नाही. ‘शाहिद’, ‘न्यूटन’, ‘ओमेर्टा’ आणि इतरांसह याआधी अनेक बायोपिकचा तो भाग आहे आणि प्रत्येक कामगिरीला प्रचंड प्रेम आणि समीक्षकांची प्रशंसा मिळाली आहे आणि आता‘ श्रीकांत’ ही त्याच्या प्रसिद्ध चित्रपटसृष्टीत आणखी एक भर पडली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube