Rakhi Sawant: ड्रामा क्वीन ‘या’ कारणासाठी घेणार पंतप्रधानांची भेट; म्हणाली, “जर कंगनाला रनौतला…”

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 26T173346.787

Rakhi Sawant: बॉलीवूडची ड्रामा क्वीन (Drama queen) म्हणून ओळखल असणारी राखी सावंत (Rakhi Sawant) काही ना काही कारणाने सतत चर्चेमध्ये असते. गेल्या काही दिवसांपूर्वी राखीला लॉरेन्स बिश्नोई टोळीने (Lawrence Bishnoi tribe) जीवे मारण्याची धमकी (threat) दिली होती. भाईजानच्या धमकी प्रकरणापासून दूर राहण्याचा इशारा राखी सावंतला दिला होता. यानंतर राखीने लॉरेन्स बिश्नोईला थेट आव्हान दिले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


राखीचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत होता. गेल्या काही दिवसाअगोदर ईदच्या मुहूर्तावर राखी मीडियाशी संवाद साधत म्हणाली होती की, ‘मी ईदच्या मुहूर्तावर हे सांगू इच्छिते की माझ्या भाईजानला कुणीही स्पर्श करू नका. जर माझा जीव घेऊन तुमचं समाधान होणार असेल तर तुम्ही माझा जीव घ्या. एवढंच नाही तर माझ्या खुनाचा गुन्हा देखील तुमच्यावर घेऊ नका. या वक्तव्यामुळे राखी सावंत जोरदार चर्चेत आली होती.

आता पुन्हा या प्रकरणामध्ये एक वेगळे वक्तव्य तिने केले आहे. तिच्या या वक्तव्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. बॉलीवूडची ड्रामा क्वीन लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुरक्षेसाठी भेट घेणार आहे. इन्स्टंट बॉलिवूड या एंटरटेनमेंट पोर्टलशी संवाद साधत असताना राखी म्हणाली, “मी लवकरच मोदीजी यांची भेट घेणार आहे. खरंतर मी हे इतक्यात कोणालाच सांगणार नव्हते.

सुनील बर्वेच्या अमर फोटो स्टुडिओ नाटकानं घेतला अखेरचा निरोप

मी झेड (z) सिक्युरिटीसाठी मोदीजी यांच्याकडे मागणी करणार आहे. जर ते ही सुरक्षाव्यवस्था कंगना रनौतला देतात, तर मग मला का नाही देऊ शकत? असा सवाल तिने उपस्थितीत केला आहे. कंगनाला तर कसलीही धमकी मिळाली नव्हती, माझ्याकडे तर धमक्यांचे मेल आहेत. तरी देखील मला झेड (z) सिक्युरिटी दिली नाही. गेल्या काही दिवसापासून भाईजानला सतत धमक्या देणाऱ्या टोळीने राखीलासुद्धा मेलच्या माध्यमातून धमकी दिली होती.

ज्या व्यक्तीने भाईजानला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्याचं नाव ‘रॉकी भाई’ असं होतं. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, संबंधित आरोपी राजस्थानातील जोधपूर येथील रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपण गोरक्षक आहोत असा दावा आरोपीने यावेळी केला होता.

Tags

follow us