आई-वडिलांबद्दल वल्गर प्रश्न; टीकेची झोड उठल्यावर रणवीर अलाहाबादियाने मागितली माफी
Ranveer Allahbadia apologies after his controversial questions : प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादिया याने एक वादग्रस्त विधान केल्याने त्याच्यावर सर्वच क्षेत्रांतून टीकेची झोड उठत आहे. त्यानंतर आता मात्र त्याने त्याच्या या वादग्रस्त विधानावर माफी मागून विवादीत भाग कापून टाकण्याची विनंती व्हिडीओ मेकर्सला केली आहे. काय म्हणाला रणवीर तसेच त्याचं वादग्रस्त विधान काय होतं पाहुयात?
काय म्हणाला रणवीर?
इंडियाज गॉट टॅलेंट या कार्यक्रमाच्या मंचावर मी केलेला विनोद योग्य नव्हता. त्यासाठी मी जाहिर माफी मागतो. या विधानावर मी कोणतही स्पष्टीकरण देऊ इच्छित नाही. या प्रसंगातून मी चांगला धडा घेतला आहे. यानंतर मी अशाप्रकारे कुटुंबाची चेष्टा करणार नाही. मी विवादीत भाग कापून टाकण्याची विनंती व्हिडीओ मेकर्सला केली आहे.
डोनाल्ड ट्रम्पने भारतीय बाजार पाडला! एका निर्णयाने बीएसई स्मॉलकॅप हजार अंकांनी घसरला
रणवीरचं वादग्रस्त विधान
गेल्या काही दिवसांपूर्वी वादात सापडलेल्या समय रैनाचा शो इंडियाज गॉट टॅलेंट पुन्हा एकदा वादात सापडला तो रणवीर अलाहाबादिया याने एक वादग्रस्त विधान केल्याने. या कार्यक्रमात रणवीरने एका स्पर्धकाला प्रश्नविचारला होता की, तुम्हाला तुमच्या पालकांना इंटीमेट होताना पाहायचं आहे का? की तुम्हाला त्यांच्यात सामील व्हायचंय? या अश्लील आणि आई-वडिलांच्याबद्दल अपमानजनक विधानावरून त्याच्यावर सर्वच क्षेत्रांतून टीकेची झोड उठत आहे.
उद्योजकांचे मुंबईतील हेलपाटे थांबवा, परवानगी वेळेत द्या… सामंतांची अधिकाऱ्यांना तंबी
मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया
रणवीर अलाहाबादिया याच्या या आक्षेपार्ह विधानावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला याबद्दल माहिती मिळाली आहे. मी स्वतः अजून ते पाहिलेलं नाही. पण, खूप वाईट पद्धतीने काही गोष्टी म्हटल्या आहेत, असं मला समजलं. हे पूर्णपणे चुकीचे आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, पण जेव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो, तेव्हा ते स्वातंत्र्य संपतं आणि असं करणं अजिबात योग्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काही मर्यादा असतात. आपल्या समाजात आपण अश्लीलतेचे काही नियम बनवले गेले आहेत, ते निय जर कोणी ओलांडत असेल तर ते खूप चुकीचं आहे, असं काही घडत असेल तर त्यावर कारवाई व्हायला पाहिजे, असं फडणवीस म्हणाले.