Ghoomer : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केलं अभिषेकच्या ‘घूमर’चं कौतुक!

Ghoomer : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केलं अभिषेकच्या ‘घूमर’चं कौतुक!

Sachin Tendulkar Ghoomer : अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘घूमर’ (Ghoomer) हा सिनेमा 18 ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झाला. या सिनेमाची गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरु होती. कलाकार सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत होते. त्यानंतर देखील आर बाल्की यांचा हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. सुरुवातीच्या पासून घूमरने बुल्स आय हिट केले आहे आणि 2023 च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी तो चित्रपट ठरला आहे. सोशल मीडिया असो किंवा बातम्यांमध्ये घुमरची चर्चा बघायला मिळत आहे. त्यात आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने देखील या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

Video Viral: योगींच्या पाया का पडले? ट्रोल झाल्यावर थलायवा कारण सांगत म्हणाले…

सचिन तेंडुलकरने अलीकडेच आर बाल्कीचा घूमर पाहिला आणि अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर स्टारर चित्रपटाबद्दल त्याने कौतुक केलं. सचिन ने या चित्रपटाला अत्यंत प्रेरणादायी चित्रपट म्हटले आहे. त्याने नुकतचं याबद्दल एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो,’मी नुकताच घूमर पाहिला आणि हा एक अत्यंत प्रेरणादायी चित्रपट आहे. जोश, इच्छाशक्ती आणि स्वप्न यांना कोणतीच सीमा नाही. कोणतेही लक्ष्य शक्य आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, खऱ्या आयुष्यातही मला हे जाणवले आहे की, आयुष्यात चढ-उतार असतात आणि नेमके तेच हा चित्रपट आपल्याला दाखवतो.

हा मस्तवालपणा खोक्यातून आला आहे; दादा भुसेंच्या विधानाचा राऊतांकडून खरपूस समाचा

खेळांद्वारे, आपण बरेच धडे शिकतो आणि जेव्हा आपण यशस्वी होता तेव्हा ते नेहमीच असण्याची गरज नाही. अपयश, दुखापती आणि निराशा, ते तुम्हाला आयुष्यात खूप काही शिकवतात आणि याच विषयावर हा चित्रपट आहे. मी तरुणांसाठीही म्हणेन की हा चित्रपट तुम्हाला इतकं शिकवू शकतो की आयुष्यात कधीही हार मानू नका आणि सर्व आव्हानांवर मात करा. आव्हाने येणार आहेत, जीवनाच्या सर्वच पैलूंमध्ये आव्हाने येणार आहेत. ती आव्हाणं जिंकण्यातचं मजा आहे. हेच हा चित्रपट आपल्याला सांगतो.’ असं म्हणत सचिन तेंडुलकरने अभिषेकच्या ‘घूमर’चं कौतुक केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube