2024 सईसाठी ठरलं बॉलिवुडमय; इमरान हाश्मी आणि प्रतिक गांधीसोबत दिसणार

2024 सईसाठी ठरलं बॉलिवुडमय; इमरान हाश्मी आणि प्रतिक गांधीसोबत दिसणार

Sai Tamhankar : मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ( Sai Tamhankar ) एक्सेल एंटरटेनमेंट सोबत दोन नव्या प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार असून 2024 मध्ये सई बॉलिवुड मध्ये दमदार काम करताना दिसणार आहे. इम्रान हाश्मी आणि प्रतीक गांधी यांच्या सोबत ती ‘ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ मध्ये ती झळकणार आहे. बॉलिवुड मध्ये सई इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी सोबत काय भूमिका साकारणार हे बघण आता उत्सुकतेच ठरणार आहे.

लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच; उमेदवारी मिळताच नवनीत राणांचं मोठं विधान

सई ताम्हणकर हिच्या ‘ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ या दोन्ही आगामी प्रोजेक्ट च्या घोषणा ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या स्लेट मधून करण्यात आली असून सई या दोन्ही प्रोजेक्ट्स चा भाग बनली आहे. या दोन्ही आगामी प्रोजेक्ट बद्दल आता प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. इम्रान हाश्मी आणि प्रतीक गांधी सारख्या दोन दमदार कलाकारांचा सोबतीने सई दिसणार असून तिच्या साठी हा क्षण खूप खास आणि तितकाच महत्त्वाचा आहे.

राम चरणच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना खास भेट; Game Changer चं पहिलं वहिलं गाणं रिलीज

एक्सेल एंटरटेनमेंटसोबत पुन्हा काम करण्याची संधी तिला मिळाली असून या प्रोजेक्ट्स बद्दल सई म्हणते “ एक्सेल एंटरटेनमेंट सारख्या प्रोडक्शन हाऊस सोबत काम करण्याची संधी मला मिळाली याचा खूप आनंद आहे. कायम वेगवेगळ्या प्रोजेक्ट वर एक्सेल काम करत आणि म्हणून त्यांच्या सोबतीने काम करण्याची वेगळी मज्जा आहे आणि मला त्यांच्यासोबत तीनदा काम करण्याची संधी मिळाली याहून मोठी गोष्ट काय शकते ! ‘ डब्बा कार्टेल’ सोबतीने ” ग्राउंड झिरो ” आणि ” अग्नी ” हे सगळेच प्रोजेक्ट्स माझ्या करिअरचा एक महत्त्वाचा भाग आहे ”

‘राणांना पाडण्यासाठी काहीही करणार’; उमेदवारी जाहीर होताच बच्चू कडूंनी रणशिंग फुंकलं!

तिच्या आगामी प्रोजेक्ट मधल्या खास सह-कलाकारांबद्दल सई म्हणते “इमरान हाश्मी आणि प्रतीक गांधी या दोघांची स्तुती करावी तेवढीच कमी आहे. दोघांच्या सोबतीने काम करण्याचा अनुभव खूप शिकवून जाणारा होता. इमरान आणि प्रतीक हे अप्रतिम अभिनेते आहेत. आम्ही सोबत काम करतोय आणि आता हे काम कधी एकदा मोठ्या पडद्यावर येणार आहे यासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत. माझ्यासाठी ही एक स्वप्नपूर्ती आहे असं म्हणायला हरकत नाही कारण बॉलिवुड मधल्या य दोन कलाकारांच्या सोबतीने काम करण याहून मोठ काय असणार ”

‘ग्राउंड झिरो’ आणि ‘अग्नी’ या व्यतिरिक्त सई ‘डब्बा कार्टेल’ मध्ये सुद्धा दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर ” डब्बा कार्टेल ” रिलीज होणार असून एक्सेल एंटरटेनमेंटसोबत सईचा हा तिसरा प्रोजेक्ट असणार आहे. या चित्रपटात शबाना आझमी, ज्योतिका, शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. एकंदरीत कामाचं सातत्य जपत सई बॉलिवुडवर अधिराज्य गाजवणार यात शंका नाही. 2024 मध्ये सईच्या बॉलिवुड प्रोजेक्ट्सची लाईन खूप मोठी आहे आणि हे बघण आता उत्सुकतेच ठरतंय.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज