लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच; उमेदवारी मिळताच नवनीत राणांचं मोठं विधान
Navneet Rana : लक्ष्मीच्या हाती कमळ असतंच, असं मोठं विधान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना भाजपकडून उमेदवारी मिळताच केलं आहे. दरम्यान, अमरावती लोकसभेच्या (Amravati Loksabha) जागेवरुन मागील अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येत होतं. अमरावतीच्या स्थानिक नेत्यांसह आमदर बच्चू कडू यांच्याकडून नवनीत राणा यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध केला जात होता. मात्र, नवनीत राणा यांनी विरोधी नेत्यांच्या नाकावर टिचून भाजपचं तिकीट आणलं आहे. तिकीट जाहीर झाल्यानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
Thakishi Sanvad : जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य अन् गिरिजा ओककडून नव्या नाटकाची घोषणा
नवनीत राणा म्हणाल्या, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी. मंत्री अमित शाहा आणि देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी दिल्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे. मी मागील 12 वर्षांपासून अमरावतीची सून आहे. अमरावतीत काम करीत आहे. अमरावतीकरांचीही हीच इच्छा होती, लक्ष्मीच्या हात कमळ हे असतंच हीच इच्छा अमरावतीकरांची होती. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर पक्षप्रवेशाची पुढील तयारी करणार असल्याचं नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं आहे.
अखेर ठरलं! ज्योती मेटे लोकसभा लढवणार, शासकीय नोकरीचा दिला राजीनामा
महायुतीच्या सर्वच घटक पक्षांतील नेतेमंडळी मला सिनिअर आहे, यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि अमित शाहांसाठी अबकी बार चारसो पारच्या टार्गेटसाठी सर्वच नेते महायुतीचं काम करणार आहेत. महायुतीतील सर्वच वरिष्ठ नेत्यांनी अमरावतीच्या विकासासाठी डोक्यावर हात ठेवावा , अशी साद नवनीत राणा यांनी महायुतीच्या सर्वच नेत्यांना घातली आहे. लक्ष्मी नाव जेव्हा आपण देतो, अमरावतीची मी सून सुनेला लक्ष्मी म्हणतो. लक्ष्मीच्या हाती कमळच असलं पाहिजे ही अमरावतीकरांची इच्छा होती, त्यांच्या इच्छेनूसार माझ्या हाती कमळ असल्याचंही राणा म्हणाल्या आहेत.
बच्चू कडूंचा इशारा..
नवनीत राणा यांनी घरात घूसून मारण्याची भाषा केली होती, आम्ही गुवाहाटीला खोके घेऊन गेलो असं ते म्हणाले होते. सरकार म्हणून फडणवीस फोन करतात पण अमरावतीच्या तिकीटाच्या वेळी फोन करीत नाही. आम्ही आमची भूमिका भाजपसमोर मांडली होती, मात्र भाजपकडून राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नवनीत राणा यांना मिळालेल्या उमेदवारीचा आम्ही ठामपणे विरोध करणार असून एकतर उमेदवार उभा करु नाहीतर या वेळेचा निकाल आम्ही नक्कीच देणार असल्याचं बच्चू कडू यांनी इशारा दिला आहे.