Matka King: ‘मटका किंग’मध्ये मराठी कलाकारांची हवा, नागराज आणि सई पहिल्यांदाच एकत्र दिसणार

Matka King: ‘मटका किंग’मध्ये मराठी कलाकारांची हवा, नागराज आणि सई पहिल्यांदाच एकत्र दिसणार

Sai Tamhankar will in lead role Mataka King Film : 2024 वर्ष हे सई ताम्हणकरसाठी (Sai Tamhankar) खरंच खास आहे. याच कारण देखील तितकच वेगळं आहे. काही दिवसांपूर्वी एक्सेल एंटरटेनमेंटसोबत दोन नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा करत सईने तिच्या बॉलिवुड प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती. काल अमेझॉन प्राईमने “मटका किंग” (Mataka King) ची अधिकृत घोषणा करून सईदेखील या खास प्रोजेक्टचा भाग असल्याचं सांगितलं आहे.

Pushpa 2 : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलली, आता चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

संपूर्ण जगाला ” सैराट ” करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजिते फिल्ममेकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ” मटका किंग ” मध्ये सई मुख्य भूमिकेत दिसणार आहे. केली होती. 2024 हे वर्ष सई साठी बॉलिवुडमय ठरतंय यात शंका नाही. एकामागोमाग एक असे दमदार प्रोजेक्ट्स ती करणार आहे. ” भक्षक ” या हिंदी वेब शो नंतर सई ने “अग्नी ” ” ग्राउंड झिरो ” आणि आता ” मटका किंग ” अश्या उत्कंठावर्धक बॉलिवुड प्रोजेक्ट मध्ये सई झळकणार आहे.

Sharad Pawar : तुमच्या ‘शांती’नं क्रांती घडली; पवारांनी गप्पांमधून सांगितला पुढचा ‘रोड मॅप’

2024 मध्ये सई बॉलिवुड मध्ये दमदार काम करताना दिसतेय आणि आगामी काळात ती अजून उत्कठावर्धक प्रोजेक्ट्स करणार यात शंका नाही. ” मटका किंग” च शूटिंग काही दिवसापूर्वी सुरू झाल्याचं देखील या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. विजय वर्मा आणि अनेक बॉलिवुड कलाकारांची मांदियाळी असलेल्या या शो मध्ये सई मुख्य भूमिका साकारणार आहे.

संरक्षण बजेटमध्ये वाढ, हत्यारं अन् दारुगोळा खरेदीसाठी 548 अब्ज; पाकिस्तानचा प्लॅन काय?

” मटका किंग ” बद्दलची घोषणा सगळ्याच प्रेक्षकांसाठी उत्साही बातमी तर आहेच पण सई यात काय भूमिका साकारणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. सई आणि नागराज मंजुळे यांचा हा पहिला प्रोजेक्ट असणार आहे आणि म्हणून यातून काय सिनेमॅटिक अनुभव अनुभवायला मिळणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

धक्कादायक! आईसक्रीममध्ये आढळलं मानवी बोट; मालाडमधील घटना, कंपनीवर गुन्हा दाखल

नागराज मंजुळे मंजुळे यांच्या सोबत काम करण्याबद्दल सई म्हणते “नागराज मंजुळे सोबत काम करण्याची इच्छा माझी होती आणि ही गोष्ट माझ्या विश लिस्ट मध्ये देखील होती आता आम्ही मटका किंग सारख्या प्रोजेक्ट साठी सोबत काम करतोय आणि या निमित्ताने ही इच्छा पूर्ण होते याचा आनंद आहे. अनेक इंटरव्ह्यू आणि सोशल मीडिया पोस्ट मधून त्यांच्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त देखील केली होती आणि स्वप्नपूर्ती होते म्हणून एक वेगळं सुख आहे हे! अमेझॉन प्राईमसाठी ही वेब सीरिज आम्ही करतो आहोत.

Maharaj Controversy : जुनैदच्या ‘महाराज’ चित्रपटाला वादाचे ग्रहण, कोर्टात याचिका दाखल

विजय वर्मा देखील त्याचा एक भाग आहे विजय सोबत सुद्धा पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव या मुळे मिळणार आहे. तो एक उत्तम कलाकार आणि त्यांचा सोबत हा प्रोजेक्ट करतेय म्हणून मी खूप उत्सुक आहे. आता पुरत एवढंच सांगू शकते मटका किंग हा एक वेगळा अनुभव असणार आहे लवकरच या बद्दल अनेक गोष्टी तुम्हाला समजतील. नागराज मंजुळे, विजय वर्मा आणि मटका किंग साठी मला खूप उत्सुकता आहे हे वेगळं थ्रील असणार यात शंकाच नाही”

“ग्राउंड झिरो” “अग्नी” सारखे दोन उत्तम चित्रपट आणि आता “मटका किंग” वेब सीरिज या व्यतिरिक्त सई “डब्बा कार्टेल” वेब सीरिज मध्ये सुद्धा दिसणार आहे. या वर्षाच्या शेवटी नेटफ्लिक्सवर “डब्बा कार्टेल” रिलीज होणार असून यात शबाना आझमी, ज्योतिका शालिनी पांडे, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव आणि जिशु सेनगुप्ता यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. एकंदरीत कामाचं सातत्य जपत सई बॉलिवुडवर अधिराज्य गाजवणार यात शंका नाही. 2024 मध्ये सईच्या बॉलिवुड प्रोजेक्ट्सची लाईन खूप मोठी आहे. हे बघण आता उत्सुकतेच ठरतंय. बॉलिवुडला सईच्या अभिनयाची भुरळ पडली आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही !

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज