सई ताम्हणकरचं हटके फोटोशूट! झेब्रा क्रॉंसिंग थीम चर्चेत

सई ताम्हणकरचं हटके फोटोशूट! झेब्रा क्रॉंसिंग थीम चर्चेत

Sai Tamhankar Zebra Crossing Theme : अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) नेहमीच हटके फोटोशूट करत असते. आताही सईने केलेलं फोटोशूट चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस पडलेलं आहे. नवं फोटोशूट खूपच चर्चेत आलंय. सई नेहमीच आपलं फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करत असते. पुन्हा सईची झेब्रा क्रॉसिंग थीम फोटोशूट चर्चेत (Sai Tamhankar Latest Photo) आलंय. मीम्स आणि सईच्या फोटोची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

सईनं २०२४ वर्षाची सुरूवात दणक्यात केली होती. त्यानंतर सई वारंवार चर्चेत राहिली आहे. सई ताम्हणकरच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मानवत मर्डर्स मधल्या समिंद्री (Marathi Actress) या भूमिकेचे प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी तोंड भरून कौतुक केलंय. सईने तिच्या रोजच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका साकारून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आता सई पुन्हा चर्चेत नव्या फोटोशुटमुळे चर्चेत आलीय.

Sai Tamhankar : “समिंद्री” च ‘या’ बड्या दिग्दर्शक अभिनेत्याकडून कौतुक!

इंडस्ट्रीत सई ही अशी एकमेव अभिनेत्री आहे, जी कॉन्सेप्ट फोटोशूट करताना दिसते. याच वेगळेपणामुळे सईच लेटेस्ट फोटो शुट चर्चेत आलं आहे.या नवीन लूकमध्ये सई झेब्रा क्रॉसिंग थीमवरच्या आउटफिट मध्ये दिसून आलीय. चाहत्यांनी तिच्या या फोटो शूटवर भन्नाट कॉमेंट्स तर केल्या पण भरभरून मीम्स देखील केले आहेत.

Sai Tamhankar : सिंपल पण तितकीच सुंदर… सईच्या हटके फोटोंवर चाहते फिदा…

सईच्या फॅन्सने एकाहून एक कमालीचे मीम्स बनवून हा लूक अजून चर्चेत आणला आहे. एका चाहत्याने हा झेब्रा भारताबाहेर गेला नाही पाहिजे, असं म्हटलंय तर एका चाहत्याने ने हाऊ टू कंट्रोल व्हीएकल असा मीम्स क्रिएट केलाय. सईने हे सगळे मीम्स तिच्या सोशल मीडियावर शेयर केले आहेत.

प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणारी सई तिच्या प्रेक्षकांची सुपरस्टार तर आहेच पण तिच्या अनेक नवनवीन आणि आव्हानात्मक भूमिकांना देखील ती तितकाच न्याय देऊन साकारताना दिसते. आगामी काळात सई अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारणार आहे. बॉलिवूड आणि मराठी या दोन्ही विश्वात ती काम करताना दिसणार आहे. ग्राउंड झीरो, अग्नी, गुलकंद, असंभव, डब्बाकार्टेल अश्या अनेक प्रोजेक्ट्स मध्ये सई मुख्य भूमिका साकारणार असल्याचं कळतंय !

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube