पुढच्या मराठी नववर्षाची सुरुवात होणार गोड! ‘साखर खाल्लेला माणूस’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Sakhar Khallela Manus हा कौटुंबिक चित्रपट नवीन वर्षात म्हणजेच ७ एप्रिल २०२७ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.
Sakhar Khallela Manus will be coming to the audience on next Marathi New Year : अंगणात उभारलेली गुढी, कौलारू घर, सभोवतालचा निसर्ग आणि नात्यांच्या गोडव्याची चाहूल देणारं वातावरण… अशा आकर्षक पोस्टरसह नव्या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. ‘साखर खाल्लेला माणूस’ हा कौटुंबिक चित्रपट नवीन वर्षात म्हणजेच ७ एप्रिल २०२७ रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची संहिता पुण्यातील दगडू शेठ गणपतीच्या चरणी ठेवून बाप्पाचे आशीर्वाद घेऊन चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात झाली आहे.
विखे फॅक्टरमुळे अवघ्या चार दिवसांत आमदारकी! आमदार तनपुरेंकडून प्रांजळ कबुली
पोस्टरवरूनच हा चित्रपट कुटुंब, नाती आणि माणुसकीच्या गोडव्याभोवती फिरणार असल्याचा अंदाज येतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंबाला एकत्र आणणारी, हसवणारी आणि भावूक करणारी कथा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात समीर चौघुले, सोनाली कुलकर्णी, नयना आपटे, अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री आणि नील सालेकर यांसारखे लोकप्रिय कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. विविध पिढ्यांतील कलाकारांची ही दमदार फळी चित्रपटात विशेष रंगत आणणार आहे.एबीसी क्रिएशन आणि नितीन वैद्य प्रॅाडक्शन्स निर्मिती या चित्रपटाचे निर्माते डॉ. आशिष अग्रवाल आणि नितीन प्रकाश वैद्य असून ऋत्वी तावडे सहनिर्माती आहेत. चित्रपटाचे लेखन विद्यासागर अध्यापक यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा पांडुरंग कृष्णा जाधव यांनी सांभाळली आहे.
“हिल पोरी हिला” गाण्याची भारताला भुरळ भारताच्या यूट्यूब मध्ये 24 व्या क्रमांकावर गाणं होतंय ट्रेंड !
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक पांडुरंग कृष्णा जाधव म्हणाले, ‘’साखर खाल्लेला माणूस’ ही केवळ एका व्यक्तीची कथा नाही, तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील नात्यांचा गोडवा जपणारी गोष्ट आहे. कुटुंबासोबत बसून मनमुराद हसता यावं, भावनांशी जोडता यावं आणि चित्रपट संपल्यानंतरही त्यातील माणसं मनात राहावीत, असा हा प्रवास आहे. गुढीपाडव्यासारख्या शुभ दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांसमोर आणताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.’’ मराठी नववर्षाच्या निमित्ताने प्रेक्षकां साठी एका गोड, मनोरंजक आणि कौटुंबिक चित्रपटाची मेजवानी घेऊन येणारा ‘साखर खाल्लेला माणूस’ या चित्रपटाची प्रेक्षक आता आतुरतेने वाट पाहाणार हे नक्की !