Salman Khan: भाईजानच्या ‘टायगर ३’ची कथा अशी असणार? प्रदर्शनाआधी लीक झाली

Salman Khan: भाईजानच्या ‘टायगर ३’ची कथा अशी असणार? प्रदर्शनाआधी लीक झाली

Tiger 3: भाईजानच्या (Bhaijaan) बहुचर्चित ‘टायगर ३’ ची कथा लीक झाली असल्याची चर्चा सोशल मीडियावर (Social media) असल्याचे दिसून आले आहे. अचानक सिनेमाचे कथानक IMDB या साईटवर लीक करण्यात आल्याचे समोर आले आहे . भाईजानच्या (Salman Khan) चाहत्यांनी हे प्रकरण लक्षात आणून दिले आहे. IMDb सहसा सिनेमाची योग्य माहिती देते.

परंतु हे कथानक योग्य आहे की नाही. हे सिनेमा रिलीज झाल्यावर समजणार असल्याचे दिसून येणार आहे. ‘टायगर ३’ मध्ये ‘एक था टायगरच्या’ अगोदरच्या गोष्ट सांगितली जाणार असल्याचा अंदाज यावरून लावला जात असल्याचे दिसत आहे. ‘एक था टायगर’मध्ये कतरिना कैफ (katrina kaif) हिने झोया या आयएसआयच्या गुप्तहेराचे पात्र साकारल्याचे दिसून आले आहे. यामध्ये झोयाच्या भूतकाळातील एक व्यक्ति तिचा बदला घेण्यासाठी या तिसऱ्या भागामध्ये समोर येणार असल्याचे दिसून आले आहे.

तसेच या नव्या मिशनवर भाईजान आणि झोया एकत्र काम करणार असल्याचे दिसून येत आहेत. झोयाच्या भूतकाळात त्या व्यक्तीची भूमिका अभिनेता इमरान हाश्मी हा करणार असल्याचे दिसून आले आहे, असंही IMDb वर लीक झालेल्या कथेमधून स्पष्ट होत असल्याचे सांगितले जात आहे. ‘टायगर ३’मध्ये आता इमरान आणि भाईजान एकमेकांसमोर दिसून येणार आहेत. सोशल मीडियावर लीक झालेल्या या कथानकाची चांगलीच चर्चा रंगत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये भाईजानचे चाहते देखील याविषयी जोरदार चर्चा करत असताना दिसत आहेत.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

यासोबतच सिनेमात ‘टायगर’सोबत ‘पठाण’ही छोट्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. तसेच ‘पठाण’मध्ये किंग खान- भाईजानची कमाल बघून ‘टायगर ३’मध्ये देखील अशाच धमाकेदार सीन्सची त्यांचे चाहते वाट पाहत असल्याचे दिसत आहेत. ‘टायगर ३’चं चित्रीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्याच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे. १५ ऑगस्टपर्यंत सिनेमाचे प्रमोशन सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाईजानचे चाहते या सिनेमाची खूप आतुरतेने वाट पाहत असल्याचे दिसून आले आहे. १० नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणारअसल्याचे सांगितले जातात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube