Bigg Boss OTT 2: भाईजान घेणार बिग बॉसमधून एक्झिट? काय आहे नेमकं कारण?

Bigg Boss OTT 2: भाईजान घेणार बिग बॉसमधून एक्झिट? काय आहे नेमकं कारण?

Salman Khan: बिग बॉस ओटीटीच्या (Bigg Boss OTT) पहिल्या सिझनचे सूत्रसंचालन दिग्दर्शक करण जोहरने (Karan Johar) केले होते. परंतु ओटीटीवर हा पहिला सिझन पाहिजे तितका गाजला नसल्याचे दिसून आला आहे. म्हणून या शोच्या निर्मात्यांनी दुसऱ्या सिझनसाठी सूत्रसंचालक म्हणून भाईजान म्हणजेच सर्वांचा सलमान खानला (Salman Khan) निवडले होते. भाईजानमुळे (Bhaijaan) बिग बॉस ओटीटीचा दुसरा सिझन (Second season) पहिल्या एपिसोडपासूनच चांगलाच चर्चेत आला होता. म्हणून हा शो दोन आठवड्यांनी परत वाढवण्यात आला होता.

परंतु आता गेल्या काही दिवसांतच भाईजानने हा शो सोडल्याचे सांगोईतले जात आहे. मात्र याबद्दलची अधिकृत माहिती आजून देखील समोर आली नाही. ‘बिग बॉस ओटीटी 2’मधील वीकेंड का वार या एपिसोड्सचे सूत्रसंचालन भाईजान करत असल्याचे दिसून येत आहे. परंतु गेल्या वीकेंडला भाईजानच्या ठिकाणी कॉमेडियन कृष्णा अभिषेक या शोचं सूत्रसंचालन करत असल्याचे दिसले आहे. भाईजान त्याच्या अगोदरच्या काही कामांमुळे त्या आठवड्यामध्ये बिग बॉसमध्ये दिसू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे, असं तेव्हा सांगण्यात आले होते.

आता त्यामागचे दुसरे कारण देखील अखेर समोर आले आहे. २ आठवड्यापूर्वीच्या भागात जेव्हा वीकेंड का वार हा खास एपिसोड प्रदर्शित करण्यात आला, त्यावेळेस भाईजानचा एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचे पाहायला मिळत होता. या फोटोत त्याच्या हातात सिगारेट बघायला मिळाली होती. यावरूनच भाईजान बिग बॉसच्या प्रॉडक्शन टीमवर जोरदार भडकला असल्याचे सांगितलं जात आहे. यामध्ये काही कारणामुळे त्याने शो सोडल्याचे सांगितले जात आहे. एवढंच नाही तर भाईजान फक्त ओटीटी व्हर्जन नाही तर टीव्ही व्हर्जनवर देखील बिग बॉस शोचे सूत्रसंचालन करणार नसल्याचे समजत आहे.

Sindhutai Mazi Mai: छोट्या पडद्यावर पाहता येणार माईंचा जीवनप्रवास; “सिंधुताई माझी माई – गोष्ट चिंधीची” प्रोमो समोर

बिग बॉस खबरी या सोशल मीडिया पेजवर बिग बॉस संबंधित सर्व अपडेट पोस्ट केले जात असतात. या पेजने भाईजानचे शो सोडण्याविषयीच्या चर्चांवर भाष्य केले आहे. ‘भाईजान हा शो सोडण्याच्या चर्चा केवळ अफवा असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील आठवड्यामध्ये तो पुन्हा शोमध्ये दिसणार नसल्याचे यावेळी त्याने सांगितले होते, असं ट्विट या पेजवर करण्यात आले आहे. भाईजान गेल्या काही वर्षांपासून या शोचं सूत्रसंचालन करत आहे. तसेच या बिग बॉस शोचा सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून देखील त्याला मानलं जातं.

अनेकदा स्पर्धकांना त्याच्यावर पक्षपातीचा देखील आरोप करण्यात येत असतो. बिग बॉस ओटीटीमधून बाहेर पडलेल्या काही स्पर्धकांनी भाईजानवर अनेकदा आरोप करण्यात आले होते. यानंतर त्याचा हातात सिगारेट असलेला फोटो देखील व्हायरल करण्यात आला होता. या सर्व कारणांमुळे नाराज झालेल्या भाईजानने शो सोडण्याचा निर्णय हाती घेतला आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे. यामुळे या चर्चांचं उत्तर आता चाहत्यांना  येत्या ‘वीकेंड का वार’ (Weekend Ka War) एपिसोडमध्येच बघायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube