अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा

Image 750x 2022 09 13 08_17_09pm 632097ed49f9b

मुंबई : अभिनेत्री तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिझान मोहम्मद खान पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची सतत चौकशी सुरू आहे. आता शिझानने खुलासा केला आहे की, तुनिषाने या अगोदरही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तर तुनिषाचे मामा पवन शर्मा यांनी याप्रकरणाची चौकशी लव जिहादच्या बाजूने व्हावी. तर तुनिषा शर्माचे 15 दिवसांपूर्वीच ब्रेकअप झाले होते. वयातील अंतर आणि धर्म वेगवेगळे असल्याने त्यांनी ब्रेकअप केले होते.

अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने शनिवारी दुपारी वसईतील स्टुडियोमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तुनिषाचा प्रियकर आणि मालिकेतील तिचा सहकलाकार मोहम्मद शिझान याला अटक केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिझानने प्रेमसंबध तोडल्याने निराश झाल्याने तुनिषाने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी दुपारी शिझान आणि तुनिषा या दोघांनी एकत्र त्याच्या रूममध्ये जेवण केले. त्यानंतर शिझान हा सेटवर शूटिंगसाठी गेला आणि शिझानच्या रूममध्येच तिने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तिने नेमकी आत्महत्या का केली ? तसेच तिने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली होती का त्याचा पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी दिली. ‘अलिबाबा:दास्तान ए काबुल’ या टीव्ही मालिकेत ती मुख्य भूमिका करत होती.

Tags

follow us