‘सिंघम अगेन’चा नारळ फुटला: अजय, रणवीर, अक्षयला टक्कर देणार नवा भिडू

‘सिंघम अगेन’चा नारळ फुटला: अजय, रणवीर, अक्षयला टक्कर देणार नवा भिडू

Singham Again: रोहित शेट्टी आणि अजय देवगणचा ‘सिंघम’ 2011 मध्ये रिलीज झाला होता. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्याचे आयुष्य कसे असते हे दाखवण्यात आले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. यानंतर 2014 मध्ये ‘सिंघम रिटर्न्स’ आला आणि प्रेक्षकांनीही त्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. यानंतर आता त्याचा तिसरा भाग खूप चर्चेत असून ‘सिंघम अगेन’ लॉन्च झाला आहे. 12 वर्षांनंतर तुम्हाला पुन्हा एकदा रोहित शेट्टीचे कॉप युनिव्हर्स पाहायला मिळणार आहे. यावेळी हा चित्रपट दमदार स्टारकास्ट घेऊन येत आहे.

अजय देवगण, रोहित शेट्टी, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांनी फोटो शेअर करून ‘सिंघम अगेन’च्या लॉन्चिंगची माहिती दिली. त्याच्या लॉन्च फोटोंमध्ये, रोहित शेट्टी, अजय देवगण आणि रणवीर सिंग दिसत आहे. रणवीर ‘सिम्बा’ लूकमध्ये दिसत आहे.

Mahadev App scam: कोण आहे सौरभ चंद्राकर, लग्नावर 200 कोटी खर्च, ज्यूस दुकानदार ते ‘सट्टा किंग’

फोटो शेअर करण्यासोबतच अजय देवगणने सिंघम फॅमिली पुन्हा एकदा एकत्र आल्याची माहिती दिली. या अपडेटनंतर चाहते चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. सोशल मीडियावर भरपूर कमेंट करत आहेत. या चित्रपटाबाबत लोकांमध्ये आधीपासूनच प्रचंड क्रेझ आहे. शूटिंगपूर्वीच अनेकांनी याला ब्लॉकबस्टर घोषित केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अजय देवगण, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात अर्जुन कपूरने एन्ट्री केली आहे. मात्र त्यात तो खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. याशिवाय दीपिका पदुकोणचे नाव फीमेल लीडमध्ये दिसले आहे. अशा स्थितीत आता या मल्टीस्टारर चित्रपटाबद्दल लोकांची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट लोकांच्या अपेक्षांवर खरा उतरतो की नाही हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube