लग्नाच्या २४ वर्षांनंतर सोहेल खान अन् सीमा सजदेहचा मोठा निर्णय; खासगी आयुष्याबद्दल केला खुलासा

लग्नाच्या २४ वर्षांनंतर सोहेल खान अन् सीमा सजदेहचा मोठा निर्णय; खासगी आयुष्याबद्दल केला खुलासा

Sohail Khan And Seema Sajdeh : अभिनेता सलमान खानचा भाऊ सोहैल खान याने 1998 मध्ये फॅशन डिझायनर सीमा सजदेहशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 24 वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर सीमा (Seema) तिच्या खासगी आयुष्यामुळे तुफान चर्चेत आहे. सांगायचं झालं तर, फॅबुलस लाइव्स वर्सस बॉलिवूड वाइव्स शोच्या माध्यमातून सीमाच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली. शोमध्ये सीमाने तिच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले होते.

अमेरिकेतील प्रेक्षकांना चंद्रकांत कुलकर्णींचं वाडा चिरेबंदी नाटक पाहण्याची संधी!

सीमाला एका पुरुषाचा मेसेज आला होता आणि त्यांने सीमाला जास्त पैशांची ऑफर देखली दिली होती. एका पुरुषाने मला एका महिन्याचा बजेट दिला होता. तो पुरुष 100 वर्षांचा असेल असं मला वाटलं. तो मला म्हणाला, त्याला मला त्याच्याकडे ठेवायचं होतं. यासाठी त्याने मला बजेट देखील दिलं होतं. त्याने माझी ७००० -८००० डॉलर्समध्ये बोली लावली होती. त्याचा चेहरा पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटलं. मला तर हार्ट अटॅक आला. असं सीमा म्हणाली.

घटस्फोटानंतर आयुष्यात आलेल्या अनेक प्रसंगांवर देखील सीमाने मौन सोडलं. सोहेल खान याला घटस्फोट दिल्यानंतर दुसऱ्या पुरुषाला डेट करण्यासाठी देखील सीमाला भीती वात होती. घटस्फोटानंतर सीमा आता अभिनेता बॉबी देओल याच्या पत्नीचा भाऊ विक्रम आहूजा याला डेट करत आहे.

सोहैल खान – सीमा सजदेह

सीमा सजदेह हिने 1998 मध्ये सोहेल खान याच्यासोबत पळून मंदिरात लग्न केलं होत. सीमा आणि सोहेल यांना दोन मुलं देखील आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सीमा आणि सोहेल यांच्यामध्ये वाद सुरु होते. वाद टोकाला पोहोचल्यानंतर सीमा आणि सोहेल यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या 24 वर्षांनंतर सीमा आणि सोहेल विभक्त झाले आहेत. आता दोघे देखील त्यांच्या खासगी आयुष्यात पुढे गेले आहेत.

घटस्फोटानंतर सोहेल याच्या नावाची चर्चा शेफाली बग्गा हिच्यासोबत रंगली आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं आहे. IPL 2025 दरम्यान वानखेडे स्टेडियम बाहेर सोहेल याला शेफाली सोबत स्पॉट करण्यात आलं. एवढंच नाही तर, शेफाली हिने देखील सोहेल याच्यासोबत फोट सोशल मीडियावर पोस्ट केले. पण दोघांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली नाही. सध्या सर्वत्र दोघांच्या नात्याची चर्चा सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या