VIDEO : कॉन्सर्टदरम्यान सोनू निगमवर हल्ला…दगड आणि बाटल्या फेकल्या, शो मध्येच थांबवला

VIDEO : कॉन्सर्टदरम्यान सोनू निगमवर हल्ला…दगड आणि बाटल्या फेकल्या, शो मध्येच थांबवला

Sonu Nigam Concert Incident Delhi Technological University : गायक सोनू निगम (Sonu Nigam) त्याच्या कॉन्सर्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. अलिकडेच त्याच्या कॉन्सर्टदरम्यान गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याचं समोर आलंय. तर बेकाबू गर्दीने सोनू निगमवर दगड आणि बाटल्या फेकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यावर सोनू निगमनेही (Sonu Nigam Concert) प्रतिक्रिया दिली आहे, त्याने जमावाला शांत करण्याचा देखील प्रयत्न केलाय. या गोंधळामुळे सोनुला अर्ध्यातच कार्यक्रम थांबवावा लागला होता. रविवारी ही घटना घडली होती.

कुणाल कामराचा पाय खोलात! ‘त्या’ अँगलने पोलिसांनी तपास केला सुरू; समनही बजावलं

सोनु निगमचे वृद्ध, तरूण, लहान मुलं सर्वजणच चाहते आहेत. त्याचा आवाज ऐकण्यासाठी, सोनु निगमची एक झलक पाहण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. रविवारी देखील सोनू निगमने दिल्ली टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीच्या इंजिनिफेस्ट 2025 मध्ये सादरीकरण केलं होतं. मात्र या कॉन्सर्टमध्ये मोठा गोंधळ झाला होता. यावेळी जमावाने दगड आणि बाटल्या फेकल्या. हे पाहून सोनू निगमने कार्यक्रम थांबवला. प्रेक्षकांना असं वागू नका, अशी विनंती केली.

शोमध्ये कोणीतरी हेअरबँड फेकला आणि सोनूने तो डोक्यावर घातला. सोनूने लोकांना शांत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. परंतु, जेव्हा परिस्थिती बिकट झाली तेव्हा सोनु निगमने अर्ध्यातच कार्यक्रम थांबवला.

सोनू निगमने दिली प्रतिक्रिया

परिस्थिती बिघडत चालली आहे हे पाहून, सोनु निगमने जमावाला संबोधित केलं होतं. सोनू निगम म्हणाला, ‘मी इथे तुमच्यासाठी आलोय, जेणेकरून आपण सर्वजण इथे चांगला वेळ घालवू शकू.’ मी तुम्हाला आनंद घेऊ नका, असं सांगत नाहीये, पण हे करू नका. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, सोनू निगमच्या टीममधील एका सदस्याला दुखापत झाली. या संगीत कार्यक्रमामध्ये सोनू ‘कल हो ना हो, सूरज हुआ मद्धम’ सारखी गाणी गाताना दिसला.

उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का! अहिल्यानगरमधील ‘हा’ दिग्गज नेता हाती घेणार धनुष्यबाण; पक्षप्रवेश कन्फर्म

फेब्रुवारीमध्ये सोनू निगमचा कोलकातामधील कॉन्सर्टही चर्चेत होता. यावेळी सोनूला राग आला. सोनू निगमचे व्हिडिओ व्हायरल झाले ज्यामध्ये तो गर्दीवर ओरडताना दिसत होता. आता रविवारी सोनू निगम दिल्ली विद्यापीठात एक संगीतमय कॉन्सर्ट सादर करत होते. यादरम्यान, जमावाने गायक आणि त्याच्या टीमवर बाटल्या आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे त्याची टीम अडचणीत आली.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube