तोडकं मोडकं हिंदी बोलतो पण महाराष्ट्रात मराठीच; हिंदी सक्तीवरून अभिनेत्याचे खडेबोल

तोडकं मोडकं हिंदी बोलतो पण महाराष्ट्रात मराठीच; हिंदी सक्तीवरून अभिनेत्याचे खडेबोल

speaks Hindi but only Marathi in Maharashtra Actor Samir Choughule on Hindi compulsion : राज्यात पहिलीपासून तिसरी भाषा (Third Language) म्हणून हिंदी किंवा भारतीय भाषा शिकविण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केल्यानंतर एकाच दिवसात तिसऱ्या भाषेचा समावेश असलेले वेळापत्रक आणि विषयनिहाय योजना राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) जाहीर केली. त्यावर राज्यातील सर्वच स्तरावरून टीका केली जात आहे. त्यात आता महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते समीर चौघुले यांनी देखील फेसबुक पोस्टद्वारे सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे.

काय म्हणाले समीर चौघुले?

आम्ही मराठी बोलतो. जसं जमेल तसं तोडकं मोडकं हिंदी बोलतो. तेवढं जगायला पुरेसं आहे. एवढ्या नाजूक आणि लहान वयात मुलांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हिंदी किंवा तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच. आम्ही कार्यक्रमात हमरेको तुमरेको करतो त्या भाषेत ही 90 टक्के मराठीच असतं. कारण आपण 90 टक्के मराठी माणसे याच प्रकारे हिंदीत व्यक्त होतो आणि ते फक्त आणि फक्त विनोदापुरतं असतं.

‘हृतिक रोशन आणि एनटीआर यांच्यातील अ‍ॅक्शनसाठी स्वतःला पूर्णपणे बुडवून टाकले; अयान मुखर्जींचा मोठा खुलासा

त्यामुळे आम्हाला आमच्याच कामाचे दाखले कृपया देऊ नका आणि जे समाजात दिसतं ते आम्ही दाखवतो .आमच्या “हमरेको तुमरेको”मुळे समाज अचानक हिंदी बोलायला लागला नाहीय.आम्हाला ही हिंदी चित्रपट, हिंदी गाणी, साहीत्य आवडतं, आम्हाला हिंदीचा अजिबात राग नाही पण आम्ही सर्व ठिकाणी हट्टाने अभिमानाने मराठीच बोलतो.

उदहरणार्थ अगदी मुंबई ते छत्रपती संभाजी नगर या इंडीगोच्या विमान प्रवासात घोषणा फक्त हिंदी आणि इंग्रजीतूनच होतात.महाराष्ट्रात असुनही मराठीत घोषणा होत नाही हे मी स्वानुभवावरून सांगतोय. त्या विमानात ही मराठीचा गंध नसणाऱ्या हवाई कर्मचाऱ्यांशी आम्ही हट्टाने मराठीतच बोलतो. रिक्षावाल्यांशी ही आम्ही मराठीतच बोलतो. महाराष्ट्रात मराठीच.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube