Subhedar Movie: ‘गड आला पण… दिग्पाल लांजेकरच्या ‘सुभेदार’ सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित

Subhedar Movie: ‘गड आला पण… दिग्पाल लांजेकरच्या ‘सुभेदार’ सिनेमाचं नवं पोस्टर प्रदर्शित

Subhedar Movie new Poster: सुभेदार (Tanhaji Malusare) तान्हाजी मालुसरे रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन रायगडावर गेले होते. तिथे चिंतातूर अवस्थेतील जिजाऊ आऊसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांना (Chhatrapati Shivaji Maharaj) त्यांनी बघितलं. स्वराज्यावर आलेला बाका प्रसंग ओळखून ते स्वत: कोंढाण्याच्या मोहिमेवर जायला सज्ज झाल्याचे आपण ऐकायला आणि काही सिनेमामधून पाहायला मिळालं आहे. ( New Poster) बेलभंडारा उचलून, हात उंचावून ‘आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं’ अशी शपथ घेतल्याचे देखील आपण ऐकलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Digpal Lanjekar (@digpalofficial)


तसेच प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयावर कायमचा ठसा कोरला गेला आहे. १८ ऑगस्टला हा सिनेमा आता प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अजय पूरकरांनी सुभेदार तान्हाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारल्याचे दिसून येणार आहे. तसेच त्या काळातील प्रसंग हुबेहुब डोळ्यांसमोर उभा करण्याचे काम ज्येष्ठ चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या कुंचल्यातून अवतरलेलं चित्र आपण बालपणी इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात बघितलं आहे. शिवकालीन इतिहास सांगणाऱ्या अनेक पुस्तकात याचा समावेश करण्यात आल्याचे देखील आपण पाहिलं आहे.

त्या गाजलेल्या चित्रावरून प्रेरित होऊन नव्या पिढीकरिता हा प्रसंग ‘सुभेदार’ या महत्त्वाकांक्षी आगामी सिनेमात बघायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि त्यांच्या टिमने खुप मेहनत घेत ‘सुभेदार’च्या माध्यमातून शिवकालीन इतिहासातील एक सुवर्णपान शिवप्रेमींसमोर आणण्याचे काम केले आहे. १८ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अजय पूरकरांनी सुभेदार तान्हाजी मालुसरेंची व्यक्तिरेखा साकारली असल्याचे दिसून आले आहे.

Aflatoon ची ‘अफलातून’ कमाई, चौथ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

यामध्ये चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, स्मिता शेवाळे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. या सिनेमाची  ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुत निर्मित, राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड ‘सुभेदार’ या मराठी सिनेमाचे निर्माते आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube