‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणचा गोलीगत दणका, ‘राजाराणी’ चित्रपटातून गाजवणार मोठा पडदा

‘बिग बॉस मराठी’ फेम सूरज चव्हाणचा गोलीगत दणका, ‘राजाराणी’ चित्रपटातून गाजवणार मोठा पडदा

Suraj Chavan New Rajarani Movie Poster Release : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) नव्या पर्वाने सर्वत्र धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यंदाच्या ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात एका स्पर्धकाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणारा हा स्पर्धक म्हणजेच टिक टॉक स्टार सूरज चव्हाण. (Suraj Chavan) सूरजने अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकत त्यांच्यावर राज्य केलं. (Rajarani Movie) ‘बिग बॉस’च्या घरात सूरजचा खेळ पाहून सर्वत्र त्याचं कौतुक होताना पाहायला मिळत आहे. (Marathi Movie) खेळ समजला नसला तरी माणुसकी जपत, सगळ्यांची मन जपत आणि तोडीस तोड उत्तर देत सूरज स्वतःला ‘बिग बॉस’च्या घरात सिद्ध करताना दिसतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by राजाराणी (@sonaifilmcreation)


छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सूरजने झगमगाटीच्या दुनियेत स्वतःचं असं स्थान स्वतः मिळवलं. सध्या ‘बिग बॉस मराठी’ मुळे सूरज भलतात चर्चेत आलेला पाहायला मिळतोय. रिऍलिटी शोद्वारे सूरज जरी आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी तो आता मोठ्या पडद्यावर ही झळकण्यास सज्ज होताना पाहायला मिळणार आहे. लवकरच सूरज त्याच्या आगामी ‘राजाराणी’ या चित्रपटातून मोठा पडदा गाजवताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘राजाराणी’ या चित्रपटाच्या पोस्टरने साऱ्यांचीच मन जिंकली.

सूरज आता सत्य घटनेवर आधारित उलगडणार्‍या या प्रेम कथेतून महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मुख्य कलाकाराच्या दोस्ताच्या भूमिकेत सूरजला पाहणं फारच रंजक ठरणार आहे. चित्रपटात प्रमुख भूमिकेत रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे ही कलाकार मंडळी दिसणार आहेत. तर चित्रपटातील रोहनच्या मित्राच्या भूमिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात,’जिथं अत्याचार होणार तिथं सूरज उभा राहणार

‘सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे. सूरजचा ‘राजाराणी’ हा चित्रपट 18 ऑक्टोबर 2024 पासून जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube