Swanandi Tikekar अन् आशिष कुलकर्णीचा थाटात पार पडला साखरपुडा; फोटोत दिसलं प्रेम!

Swanandi Tikekar अन् आशिष कुलकर्णीचा थाटात पार पडला साखरपुडा; फोटोत दिसलं प्रेम!

Swanandi Tikekar Ashish Kulkarni Engagement: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) आणि ‘इंडियन आयडॉल’ फेम आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) यांचा साखरपुडा पार पडला आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांच्या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव करत असल्याचे दिसत आहे. स्वानंदी आणि आशिषने ३ दिवसांपूर्वी दोघांचा एक रोमँटिक फोटो (Romantic photo) शेअर करत त्यांच्या नात्याची कबुली दिल्याचे आपण पाहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)


आता स्वानंदीने थेट साखरपुड्याच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे. स्वानंदी आणि आशिषचे मेहंदी सोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहेत. आता स्वानंदी आणि आशिषचा थाटात साखरपुडा पार पडला आहे. स्वानंदी सोशल मीडियावर साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने सांगितले आहे की,”अखेर आम्ही एंगेज झालो आहोत”. स्वानंदी आणि आशिषच्या या फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव करत असल्याचे दिसून येत आहेत.

तसेचअमृता खानविलकर, अभिषेक देशमुख, शिल्पा तुळसकर, शिवानी रांगोळे, श्रेया बुगडे, ऋतुजा बागवे, अशा अनेक सेलिब्रिटींनी स्वानंदी आणि आशिषला शुभेच्छा दिल्याचे दिसून येत आहे. स्वानंदीचा थाटात साखरपुडा पार पडल्याने आता चाहत्यांना लग्नाची उत्सुकता लागल्याचे दिसून येत आहे. ‘आमचं ठरलं’, असं म्हणत स्वानंदी आणि आशिषने त्यांचं नातं जगजाहीर केलं होते. स्वानंदी कधी लग्न करणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. परंतु आता गेल्या येत्या काही दिवसांत ती लोकप्रिय गायक ‘इंडियन आयडॉल’ फेम आशिष कुलकर्णीबरोबर लग्नबंधनात अडकणार असल्याचे दिसून येणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते Dr. Mohan Agashe यांचा ‘पुण्यभूषण’ पुरस्काराने सन्मान! अनुपम खेर पोस्ट करत म्हणाले…

‘दिल दोस्ती दुनियादारी’ (Dil Dosti Duniyadari) या सिरीयलच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचलेली एक उत्तम जोडी आहे. तसेच ‘इंडियन आयडॉल १२’च्या (Indian Idol 12) माध्यमातून त्याने चाहत्यांचे कायम मनोरंजन करत असताना दिसून येत असतो. आशिष हा पुणेकर असून त्याचं स्वत:चं युट्यूब चॅनल देखील असल्याचे समोर आले आहे. ‘इंडियन आयडॉल १२’च्या माध्यमातून आशिषला मोठी लोकप्रियता मिळाली आहे. या मंचाने त्याला एका रात्रीत सुपरस्टार केले आहे. जगभरातून प्रेक्षकांचे नेहमी प्रेम मिळाले आहे. आशिष गायक असण्याबरोबर उत्तम गीतकार देखील आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube