Bai G Trailer: ‘बाई गं’ चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा संपन्न; चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत

Bai G Trailer: ‘बाई गं’ चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा संपन्न; चित्रपटात स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत

Bai G Trailer Launch: मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) ही जोडी ‘मितवा’ नंतर आता पुन्हा एकदा नवा सिनेमा घेऊन येत आहेत. आता त्यांचा नवा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. (Bai G Trailer) ‘बाई गं’ चित्रपटाचा (Bai G Movie) धमाल ट्रेलर रिलीज झाला असून आता धमाकेदार ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swapnil Joshi team (@teamswapnil)


या चित्रपटात पाच जन्मांच्या बायका अन् त्यांच्या अपूर्ण इच्छा… त्यांचा नवरा पूर्ण करू शकणार का? ‘बाई गं’ या चित्रपटात नात्यांमधली गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. नवरा बायकोचं अनोखं नातं म्हणजे, दोघांसाठी संकट पण तूच आणि त्या संकटावरील इलाजही तूच, असंच काहीसं पाहायला मिळालं. अभिनेता स्वप्निल जोशी सोबत… वर्तमान आयुष्यात तरी त्याला बायकोचं मन काही कळालं नाही. गेल्या पाच जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा तो कोणत्या प्रकारे पूर्ण करणार आहे, हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे.

सिनेमाची नेमकी गोष्ट काय?

‘बाई गं’ या भन्नाट चित्रपटाचा ट्रेलर आता लॉन्च झाला आहे. या ट्रेलरमध्ये अभिनेता खूपच तारेवरची कसरत पाहायला मिळत आहे. कॉमेडी आणि भावनेने भरपूर असा हा धमाल ट्रेलर पाहायला मिळाला आहे. यात शेवटी स्वप्नीलला बाईच्या मनाला समजायला ‘बाई चं’ रूप घ्यावं लागतंय. आता या चित्रपटाचा शेवट नक्की काय असणार आहे, हे पाहणं अतिशय रोमांचक ठरणार आहे.

स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहरे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांचा संसार, त्यातील अडचणी अन् गेल्या जन्मीच्या बायका… या सगळ्यात स्वप्नील जोशीची धावपळ अशी या चित्रपटाची गोष्ट आहे. हा सिनेमा 12 जुलै ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे खूप महत्वाचं ठरणार आहे.

Bai G: 5 जन्मांच्या बायकांच्या अपूर्ण इच्छा नवरा पूर्ण करू शकेल? ‘बाई गं’ सिनेमाचा धमाल ट्रेलर प्रदर्शित

कोण- कोण स्टारकास्ट चित्रपटात आहेत?

या चित्रपटात स्वप्नील जोशी प्रमुख भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे सुद्धा आहेत. ‘बाई गं’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांनी धुरा सांभाळली आहे. तर संकलन निलेश गावंड यांनी केलं आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केलं आहे. नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘बाई गं’ हा चित्रपट 12 जुलै ला आपल्या जवळच्या सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube