Taali : ‘या’ प्रसिद्ध निर्मात्याने ‘ताली’ सिनेमातून गौरी सावंतची कहाणी केली जिवंत

Taali : ‘या’ प्रसिद्ध निर्मात्याने ‘ताली’ सिनेमातून गौरी सावंतची कहाणी केली जिवंत

Taali : ताली’ हा बहुचर्चित वेबसिरिज प्रदर्शित झाला असून या वेबसिरिजला समीक्षकांनी आणि प्रेक्षकांनी उत्सफुर्त अशी दाद दिली आहे. त्यामुळे या वेबसिरिजची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. ट्रान्सजेंडर आणि त्यांचा संघर्ष हा अजिबातच सोप्पा नाही. (Gauri Sawant) त्यातून त्यांना अनेक विविध आव्हानांना सामोरे जावे लागते त्यातील पहिला गोष्ट आणि सर्वात म्हत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पालकांची साथ. आपले आईवडिल आपल्यासोबत असतील तर आपली अर्धी लढाई ही तिथेच पुर्ण झालेली असते.

सध्या चर्चा आहे ती म्हणजे ‘ताली’ या वेबसिरिजची. या वेबसिरिजमधून गौरी सावंत यांचा जीवन संघर्ष प्रेक्षकांसमोर आला आहे. गौरी सावंत या भारतातील सुप्रसिद्ध ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या आहेत. एक ट्रान्सजेंडर व्यक्ती एचआयव्ही आणि एड्स ग्रस्त लोकांच्या जीवनात बदल घडवत असताना तिच्या प्रभावी प्रवासाने सुष्मिता सेन अभिनीत 2023 च्या वेब-सीरिज “ताली” मध्ये एक अनोखं स्थान मिळवले. या कथाकथनाच्या विजयामागे एक दूरदर्शी चित्रपट निर्माती आफीफा नाडियाडवाला यांचे अनोखं नातं आहे.

2019 मध्ये आफीफा नाडियाडवाला गौरी सावंत सापडली आणि तिच्या कथेने त्या खूप प्रभावित करण्याचा प्रयत्न त्यांनी यावेळी केला आहे. या कथेने प्रभावित होऊन एक प्रवास सुरू झाला आणि “ताली” ची निर्मिती झाली. आफीफाने गौरीची केवळ ट्रान्सजेंडर कार्यकर्ता म्हणून ओळखच नाही तर एक स्त्री आणि आई म्हणून तिच्या भूमिकांचे महत्त्व ओळखले गेले आहे.

Govardhan Asrani: पुण्याच्या FTII ची इंदिरा गांधींकडे तक्रार; वाचा अभिनेते गोवर्धन असरानींचा किस्सा

आफीफा नाडियाडवाला यांचे योगदान निर्मितीच्या पलीकडे आहे. गौरी सावंत या अॅक्टिविस्ट आहेत. त्यांच्या आयुष्यावर आधारित जिवनपट आधारला आहे. या जिवनपटामध्ये सुष्मिता सेन ही गौरी सावंत यांची भूमिका साकारणार आहे. गौरी सावंत यांचा जन्म पुण्यात झाला. त्या समाजसेविका आहेत. गौरी या महिला आणि अनाथ मुलांसाठी काम करतात.

तसेच अफीफा नाडियाडवालाच्या आगामी सिनेमाची सगळेच वाट बघत असतात. आकर्षक कथा जिवंत करण्याची तिची क्षमता लक्षात घेत नेहमी त्यांच्या नव्या प्रोजेक्टची आतुरतेने चाहते वाट बघत असतात. आफीफाचे नाव एक उत्तम निर्माती म्हणून ओळखले जाते पण तिच्या कामातून ती अनोखी छाप नेहमीच बघायला मिळत असते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube