Box Office Collection : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, पाच दिवसात कमावले इतके कोटी

Box Office Collection : ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, पाच दिवसात कमावले इतके कोटी

The Kerala Story Box Office Collection : ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत आहे. काही ठिकाणी या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. तर काही ठिकाणी मात्र या चित्रपटाचे खास शो आयोजित करण्यात आले आहे. सुदीप्तो सेन (Sudipto Sen) दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालत आहे.

द केरळ स्टोरी’ची कमाई (The Kerala Story Box Office Collection Day 5)

‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट 5 मे 2023 रोजी प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करत आहे. ओपनिंग डेला या चित्रपटाने 8.3 कोटी, दुसऱ्या दिवशी 11.22 कोटी, तिसऱ्या दिवशी 16.40 कोटी आणि चौथ्या दिवशी 10.07 कोटींची मोठी कमाई केली आहे. तर पाचव्या दिवशी या चित्रपटाने 11 कोंटीची कमाई केली आहे. एकंदरीत आतापर्यंत या चित्रपटाने 57.62 कोटींचा मोठा गल्ला कमावला आहे.

‘या’ राज्यात ‘द केरळ स्टोरीला’ बंदी

तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशात हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. गुजरातमध्ये देखील मुलींना हा चित्रपट मोफत दाखवण्यात येत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या चित्रपटाचे खास शो आयोजित करण्यात आले आहेत.

राखी सावंतच्या भावाला मुंबई पोलिसांकडून अटक, 22 मे पर्यंत कोठडीत रवानगी

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी आणि सिद्धि इडनानी महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येत आहेत. चित्रपटातील सर्वच कलाकारांचे त्यांच्या दर्जेदार अभिनयामुळे सर्वत्र जोरदार कौतुक होत आहे. सुदीप्तो सेनने या चित्रपटाची दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट लवकरच 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या चित्रपटाला मोठं यश आलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube