‘The Kerala Story’ लवकरच पार करणार १०० कोटींचा आकडा; आठवड्यातच जमवला ‘इतका’ गल्ला

‘The Kerala Story’ लवकरच पार करणार १०० कोटींचा आकडा; आठवड्यातच जमवला ‘इतका’ गल्ला

The Kerala Story: ‘द केरला स्टोरी’ (The Kerala Story) हा चित्रपट ५ मे रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सिनेमाच्या कथेवरुन जोरदार वाद निर्माण झाला आहे. या सिनेमात ३२ हजार महिलांच्या धर्मांतराचा दावा खोटा आहे, हा एक प्रोपगंडा सिनेमा आहे, असं म्हणत अनेक राजकीय पक्ष (political party)आणि संघटनांनी सिनेमाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आला आहे. पण तसं जरी असलं तरी देखील या सिनेमाने पहिल्या आठवड्यामध्ये मोठी कमाई केली आहे.

या सिनेमाला चाहत्यांच्या मिळणाऱ्या प्रेमाने दिग्दर्शक सुदीप्तो सेन (Directed by Sudipto Sen) भारावून गेले आहेत. सेन यांनी ट्वीट करत याविषयी सर्वांचे आभार मानले आहे. सेन यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे. भारतात आतापर्यंत ६० लाखांहून जास्त लोकांनी ‘द केरला स्टोरी’ सिनेमाला पाहिला आहे. आजपासून एक नवा अध्याय सुरू होत आहे. ‘द केरला स्टोरी’ एकाच वेळी ४० पेक्षा जास्त देशांमध्ये प्रदर्शित होत आहे.

जास्तीत जास्त संख्या जोडल्या जात आहेत. सर्वांचे आशीर्वाद, प्रेम आणि कौतुक मला भारावून टाकत आहे. आम्हाला आजून जबाबदारी वाढल्यासारखे वाटत असल्याचे सेन यांनी ट्वीटमध्ये यावेळी सांगितले आहे. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा रोजच मोठी कमाई करत असल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सिनेमाने प्रदर्शनाच्या सातव्या दिवशी १२ कोटींचा गल्ला केला आहे. तर या सिनेमाने सहाव्या दिवशी देखील १२ कोटींची कमाई केली आहे.

‘TMKOC च्या’ निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचा आरोप केल्यानंतर आत्माराम भिडेंची प्रतिक्रिया; म्हणाले…

यामुळे गेल्या २ दिवसामध्ये या कमाईच्या आकडेवारीत फरक पडला नाही. तर त्याअगोदर या सिनेमाने पहिल्या दिवशी ८.३ कोटी, दुसऱ्या दिवशी ११.१२ कोटी, तिसऱ्या दिवशी १६.४० कोटी, चौथ्या दिवशी १०.७ कोटी आणि पाचव्या दिवशी ११.१४ कोटींची गल्ला कमावला आहे. आतापर्यंत या सिनेमाची एकूण गल्ला ८० कोटींहून जास्त झाला आहे. यामुळे आता येत्या एक-दोन दिवसांत हा सिनेमा १०० कोटींचा टप्पा पार करणार असा सर्वांना विश्वास वाटत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube