सर्वात कठीण सीन अन् आव्हानात्मक; दिग्दर्शक श्रीरंग गोडबोलेंनी सांगितलं डिटेक्टिव्ह धनंजयचे किस्से

Detective Dhananjay या वेब शो च्या चर्चा सर्वत्र सुरू असताना यावर दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांची मुलाखत घेतली ते काय म्हणाले पाहूयात...

Detective Dhananjay Web Series

The most difficult and challenging scene Director Shrirang Godbole told stories of Detective Dhananjay : मराठी ZEE5 वरील ” डिटेक्टिव्ह धनंजय रहस्यजाल” या वेब शो च्या चर्चा सर्वत्र सुरू असताना या सीरिज मधली एक खास जोडी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. डिटेक्टिव्ह धनंजय आणि त्याचा विश्वासू साथीदार छोटू म्हणजे पुष्कराज यांची केमेस्ट्री चांगलीच रंगली असून ती बघताना प्रेक्षकांना देखील मज्जा येते. रहस्य आणि धारदार कथानकावर आधारित असलेल्या या मालिकेत आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपूटकर यांच्यातील नैसर्गिक केमिस्ट्रीमुळे त्यांचा पत्राना एक वेगळीच रंगत येते आहे. विशेष म्हणजे छोटूच्या कास्टिंगची गोष्टही तितकीच रंजक आहे असं म्हणायला हरकत नाही. उत्सुकता, प्रतीक्षा आणि योग्य वेळ यांचा सुंदर संगम असलेली ही मालिका न चुकवण्यासारखी आहे यात शंका नाही. यावर दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांची मुलाखत घेतली असता त्यांनी काही खास प्रश्नांची उत्तरं दिली. ते काय म्हणाले पाहूयात…

मालिकेच्या व्यक्तिरेखा आणि टोनबद्दल अदिनाथसोबत तुमचं पहिलं संभाषण कसं झालं होतं?

मला नेमकं संभाषण आठवत नाही, पण आपला डिटेक्टिव्ह कसा असावा यावर आम्ही खूप चर्चा केली होती. आम्हाला नेहमीचा डिटेक्टिव्ह नको होता — टोपी, कोट, सिगार, गॉगल्स असा साचा नको होता. हा मराठी डिटेक्टिव्ह आहे, मराठी वातावरणातला. तो इथल्या जगापासून वेगळा वाटता कामा नये. कारण अशा वेषात एखादा माणूस इथे फिरला तर लोक लगेच त्याच्याकडे लक्ष देतील, मग तो तपास कसा करणार? डिटेक्टिव्ह असा असावा जो गर्दीत मिसळून जाईल, कुणाच्याही लक्षात येणार नाही, अगदी सामान्य माणसासारखा वावरू शकेल. तिथूनच आमची सुरुवात झाली.

पार्थ पवार जनरल सेक्रेटरी तर प्रफुल पटेल, सुनील तटकरे राष्ट्रीय कार्यकारीणीतून आऊट? व्हायरल पत्रावर सुनेत्रा पवारांचं स्पष्टीकरण

यानंतर अदिनाथ कोठारेसारख्या दमदार, हिरोइक प्रतिमेच्या अभिनेत्याला कास्ट करण्याचं आव्हान होतं. तो सहज अॅक्शन हिरो वाटू शकतो. पण आम्हाला त्याच्यातून वेगळ्या प्रकारचा डिटेक्टिव्ह उभा करायचा होता आणि ते खूप रोमांचक होतं. आम्ही त्याच्या लूकवर, बॉडी लँग्वेजवर, वागण्या-बोलण्यावर काम केलं. तसेच छोटूच्या व्यक्तिरेखेवरही. कारण धनंजय एकटा पूर्ण होत नाही, ते दोघं मिळूनच एक पूर्ण व्यक्तिमत्त्व तयार होतं. आणि तिथूनच त्यांची केमिस्ट्री तयार झाली.

डिटेक्टिव्ह धनंजय – रहस्यजाळमधून तुम्ही कोणता धडा पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये घेऊन जाणार आहात?

जेव्हा आपण व्यक्तिरेखा तयार करतो, तेव्हा त्या आपल्यालाच काहीतरी शिकवून जातात. त्या आपल्या व्यक्तिमत्त्वाचे, अपूर्ण इच्छा-आकांक्षांचे, भावना आणि कधी कधी रागाचेसुद्धा प्रतिबिंब असतात. एका अर्थाने प्रत्येक व्यक्तिरेखा ही लेखक आणि अभिनेत्याचा विस्तार असते. आणि जेव्हा हे दोघे एकत्र येतात, तेव्हा एक वेगळीच केमिस्ट्री तयार होते.

तब्बल 1 कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; PM मोदींच्या आवाहनानंतर देशात खळबळ

व्यक्तिशः सांगायचं तर, मला लहानपणापासून डिटेक्टिव्ह होण्याचं आकर्षण होतं. “मी डिटेक्टिव्ह असतो तर काय केलं असतं?” हा प्रश्न कायम मनात यायचा. या प्रोजेक्टमुळे ती उत्सुकता काही प्रमाणात पूर्ण झाल्यासारखी वाटते. आणि मला असं वाटतं की धनंजयचा एक भाग मी पुढे घेऊन चाललो आहे.

दिग्दर्शन करताना सर्वात कठीण सीन कोणता होता आणि तो का आव्हानात्मक होता?

विशिष्ट सीनपेक्षा सर्वात कठीण गोष्ट म्हणजे ट्रीटमेंट आणि व्यक्तिरेखांची बांधणी — विशेषतः पात्रांमधली केमिस्ट्री निर्माण करणं. या मालिकेत धनंजय आणि छोटू यांचं नातं उभं करणं खूप महत्त्वाचं होतं. छोटू तांत्रिकदृष्ट्या त्याचा सहाय्यक असला तरी तो धनंजयला खूप प्रिय आहे. कधी धनंजय पुढे असतो, कधी छोटू. त्या नात्यातला समतोल सतत राखणं हेच सर्वात मोठं आव्हान होतं. शूटिंगपेक्षा हे अधिक कठीण होतं.

थ्रिलरचा टोन टिकवून ठेवताना कलाकारांचे अभिनय नैसर्गिक राहावेत यासाठी तुम्ही कसं काम केलं?

थ्रिल हा अभिनयात नसतो, तो कथानकात असतो. अभिनेता फक्त त्या व्यक्तिरेखेचं आयुष्य जगत असतो. एखादा डिटेक्टिव्ह केस सोडवत असतो, ते त्याच्यासाठी तितकंच रोजचं काम आहे जितकं प्लंबरसाठी पाइप दुरुस्त करणं. जर कलाकारांनी जास्त अभिनय केला किंवा “मी किती हुशार आहे” हे दाखवण्याचा प्रयत्न केला, तर वास्तवपणा तुटतो. त्यामुळे अभिनय साधा आणि नैसर्गिक ठेवणं आवश्यक होतं.

एका वर्षासाठी सोन्याची खरेदी थांबवली, तर देशावर काय होणार परिणाम? समजून घ्या संपूर्ण गणित

थ्रिल, विनोद आणि सस्पेन्स हे परिस्थितीत आणि सबटेक्स्टमध्ये असतात, अतिनाट्यमय अभिनयात नाहीत. कथाकथनाचे अनेक स्तर असतात — एक दिसणारं कथानक, एक सस्पेन्सचं कथानक आणि एक प्रेक्षकांच्या मनात तयार होणारं कथानक. कधी कधी शेवटी उलगडा झाल्यावर प्रेक्षकांना जाणवतं की इतका वेळ अजून एक लपलेलं कथानक चालू होतं आणि हाच या शैलीचा खरा आनंद आहे.—

follow us