‘TMKOCमध्ये ‘या’ दिवशी होणार दयाबेनचं कमबॅक, गोकुळधाममध्ये आनंदाचं वातावरण

‘TMKOCमध्ये ‘या’ दिवशी होणार दयाबेनचं कमबॅक, गोकुळधाममध्ये आनंदाचं वातावरण

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या १५ वर्षांपासून हा कार्यक्रम चाहत्यांचं मोठ्या प्रमाणात मनोरंजन करत आहे. २००८ मध्ये या सिरियलचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. आज देखील या सिरियलची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. सिरियलच्या कथानकापासून ते स्टार कास्टपर्यंत सर्वच गोष्ट चाहत्यांच्या पसंतीस येत आहेत. आता या सीरियलमधील दयाबेनची (Dayaben) एन्ट्री पुन्हा एकदा होणार असल्याचे सांगितले जात आहे. (TMKOC dayaben to return after controversy TMKOC disha vakani grand entry diwali)

 

View this post on Instagram

 

A post shared by 🙏🏻Disha Vakani જય શ્રી કૃષ્ણ (@disha_vakani)


‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही सिरीयल गेल्या काही दिवसांपासून चांगलच चर्चेत येत आहे. वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या या सिरीयलतील अनेक कलाकारांनी या सिरियला  रामराम ठोकला आहे. तर अनेक कलाकारांनी सिरीयलच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप देखील केले आहेत. यामुळे अनेक कलाकारांच्या रिप्लेसमेंट देखील झाल्याचे पाहायला मिळालं आहे. परंतु अजून देखील दयाबेनची जागा कोणत्याही अभिनेत्रीला घेता आली नसल्याचे पाहायला मिळत आहे.

अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) या सीरियामधील दयाबेनच्या भूमिकेत झळकली होती. अभिनेत्री दिशा वकानीने प्रेग्नेंसीच्या कारणाने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सिरियलमधून गेल्या काही दिवसांसाठी ब्रेक घेतला होता. परंतु मॅटरनिटी लिव्ह संपल्यानंतर देखील दिशा वकानी सीरियलमध्ये परतली नसल्याचे सांगण्यात येत आहे. दिशाचे चाहते त्यांच्या लाडक्या दयाबेनची खूप मोठ्या आतुरतेने वाट बघत आहेत. गेल्या काही दिवसापासून दिशाने सिरीयल सोडल्याची चांगलीच चर्चा रंगली होती.

रणबीर-आलियाबाबत कंगनाचे धक्कादायक आरोप; लग्न केवळ प्रोमोशनसाठी ते वेगळे…

गेल्या काही दिवसांपासून सिरियलचे निर्माते दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन घेत आहेत. परंतु आता दिशा वकानी सीरियलमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री दिशा वकानी येत्या दिवाळीमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सीरियलमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू शकणार आहे. दिशा सिरियलमध्ये पुन्हा कमबॅक करत असल्याने तिच्या चाहत्यांचा देखील आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

परंतु अद्याप या वृत्तांना अधिकृत दुजोरा देण्यात आला नाही. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सीरियलमध्ये सध्या जेठालालला दयाबेनची खूप आठवण येत आहे. त्याला दयाला पुन्हा एकदा गोकुळधाममध्ये बघायचं असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जेठालाल दया परतण्याबाबत ठाम आहे. यावर सुंदरने दया लवकरच गोकुळधाममध्ये दिसणार असल्याचे भाष्य केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube