‘Trial Period’ चा ट्रेलर रिलीज, जेनेलियाच्या मुलासाठी मानव कौल बनले ‘किराए के पापा’

‘Trial Period’ चा ट्रेलर रिलीज, जेनेलियाच्या मुलासाठी मानव कौल बनले ‘किराए के पापा’

Trial Period Trailer: कपडे खरेदी करत असताना अनेकदा तुम्ही कपड्यांचा ट्रायल घेत असाल. ट्रायल घेणे म्हणजे कोणतीही वस्तू खरेदी करण्याच्या अगोदर ती वापरुप बघणे. परंतु बाबांना ट्रायलवर घेतलं आहे, असं कधी तुम्ही कोणाकडून ऐकलं आहे का? नुकताच ट्रायल पीरियड (Trial Period Trailer) या सिनेमाचा हटके ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by JioCinema (@officialjiocinema)


या सिनेमात ३० दिवस ट्रायल पीरियडवर घेण्यात आलेल्या वडिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे. अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia Dsouza) आणि अभिनेता मानव कौल (Manav Kaul) यांचा ट्रायल पीरियड हा सिनेमा चाहत्यांच्या लवकरच ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरमध्ये असे दिसून येत आहे की, एक लहान मुलगा त्याच्या आईकडे बाबा पाहिजे, असा हट्ट करतो. त्यानंतर त्या मुलाची आई त्याच्यासाठी ट्रायलवर वडील आणल्याचे दिसून आले आहे.

जिनिलिया डिसूजा आणि मानव कौल यांच्यासोबतच शक्ति कपूर, शीबा चड्ढा, गजराज राव हे कॉमेडी कलाकार देखील या सिनेमात प्रमुख भूमिकेमध्ये दिसून येणार आहेत. या सिनेमात जिनिलिया ही एका सिंगल मदरची भूमिका साकारणार आहे, तर मानव हा ट्रायल फादरची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाची चाहते देखील मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Anupam Kher: अनुपम खेर साकारणार महान कवी रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका

ट्रायल पीरियड हा सिनेमा २१ जुलै दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा सिनेमा जियो सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अलेया सेन यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. कॉमेडी आणि इमोशन्सचा तडका असणाऱ्या या सिनेमाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

जिनिलियाचा वेड हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. तर मानव यांच्या फेम गेम या सीरिजमधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. जिनिलिया आणि मानव यांच्या ट्रायल पीरियड (Trial Period) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube