Udane Ki Aasha मालिकेत गुजराती नेहा कशी साकारते? मराठी मुलगी; स्वतःच सांगितला किस्सा

Udane Ki Aasha मालिकेत गुजराती नेहा कशी साकारते? मराठी मुलगी; स्वतःच सांगितला किस्सा

Udane Ki Aasha : ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘उडने की आशा’ ( Udane Ki Aasha ) या मालिकेत सायलीची भूमिका साकारणारी नेहा हरसोरा! गुजराती असूनही मराठी मुलीची भूमिका वठवण्यासाठी स्वतःला कसं घडवलं? ते सांगितलं आहे. ती म्हणाली दिवसागणिक मी स्वतःला सायलीच्या व्यक्तिरेखेत बदलवत आहे. वास्तव जीवनातही मी माझ्या आईला ‘आई’ म्हणून हाक मारणे, सुरू केले.

अहमदनगर लोकसभेचं तिकीट कुणाला? यंदा तडजोड नाही म्हणत राम शिंदेंनी थोपटले दंड

प्रेक्षकांसमोर उत्तम दर्जाच्या मालिका सादर करण्याची परंपरा सुरू ठेवत, ‘स्टार प्लस’ वाहिनीने आजवर स्पर्श न केलेल्या आणखी एका विषयाला हात घातला आहे आणि ‘उडने की आशा’ ही नवी मालिका पेश केली आहे. या मालिकेत कंवर ढिल्लन (सचिन) आणि नेहा हसोरा (सायली) यांनी प्रमुख भूमिका वठवल्या असून सचिन आणि सायली यांच्या प्रेमाची गाथा आणि नातेसंबंधांची गुंतागुंत या मालिकेतून सादर केली जाणार आहे.

“आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेऊ”; भाजप प्रवेशाच्या चर्चांवर राणांचं सूचक वक्तव्य

या मालिकेला मराठमोळी पार्श्वभूमी लाभली आहे. ‘स्टार प्लस’ वाहिनीवर सादर होणाऱ्या ‘उडने की आशा’ या मालिकेतून एका पत्नीच्या भावभावनांच्या कल्लोळाचे चित्रण करण्यात आले आहे. ती तिच्या बेफिकीर पतीला जबाबदार व्यक्तीत कसे परावर्तित करते आणि याचा काही प्रमाणात संपूर्ण कुटुंबावर कसा परिणाम होतो, यावर बेतलेले हे नाट्य प्रेक्षकांना छोट्या पडद्यावर खिळवून ठेवेल. कंवर ढिल्लन यांनी सचिनची भूमिका साकारली आहे, जो एक टॅक्सी ड्रायव्हर आहे, तर नेहा हसोराने ‘उडने की आशा’ या मालिकेत सायली या फुलविक्रेतीची भूमिका साकारली आहे.

‘युती अजून नाही, बैठकांना जाऊ नका’; प्रकाश आंबेडकरांचा कार्यकर्त्यांना खास मेसेज

नेहा हरसोरा ही वास्तवात गुजराती आहे आणि या मालिकेत ती मराठी मुलीची भूमिका साकारत आहे. सायलीची व्यक्तिरेखा परिपूर्णतेने रेखाटण्यासाठी नेहा हरसोराने खास तयारी केली आहे. नेहा हरसोरा सायलीच्या भूमिकेत कशी वावरते हे पाहणे औत्सुक्यपूर्ण असेल आणि प्रेक्षकांकरता हे एक दृक् रंजन असेल.

या विषयी बोलताना ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘उडने की आशा’ या मालिकेतील सायलीने ऊर्फ नेहा हरसोराने सांगितले की, “’उडने की आशा’ या मालिकेत मी सायली या मराठमोळ्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे. वास्तव जीवनात मी एक गुजराती आहे, मात्र, दिवसागणिक मी स्वतःला सायलीच्या व्यक्तिरेखेत बदलवत आहे. वास्तव जीवनातही मी माझ्या आईला ‘आई’ म्हणून हाक मारणे, सुरू केले. मी परिधान केलेला पेहराव, जो एका मराठी मुलीचा आहे, मी नेहमी जो परिधान करते, त्यापेक्षा हा पेहराव पूर्णपणे वेगळा आहे. माझ्या व्यक्तिरेखेत अधिक परिपूर्णता येण्यासाठी, मी मराठी विधी परंपरा आणि सण-उत्सवांची माहिती मिळवली. मराठी मुलीची व्यक्तिरेखा साकारायला मला मजा येत आहे. काही बाबतीत मी सायलीसारखी आहे, जी माझ्याकरता एक सकारात्मक बाब आहे, कारण त्यामुळे मला सायलीची व्यक्तिरेखा साकारताना माझ्या भावना व्यक्त करणे सोपे जाते.”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज