Bhumi Pednekar: पुन्हा एकदा कथित बॉयफ्रेंडसोबत दिसली भुमी; ब्लॅक रंगाच्या गाऊनमध्ये दिसली सुंदर

Bhumi Pednekar: पुन्हा एकदा कथित बॉयफ्रेंडसोबत दिसली भुमी; ब्लॅक रंगाच्या गाऊनमध्ये दिसली सुंदर

Bhumi Pednekar Spotted with Boyfriend: अभिनेत्री भुमी पेडणेकर (Bhumi Pednekar) सध्या आपल्या बॉयफ्रेंडसोबत (boyfriend) स्पॉट झाल्याने चांगलीच ट्रोल होत आहे. त्यामुळे तिची सोशल मीडियावर (Social media) चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. सध्या तिची पुन्हा एकदा चर्चा रंगलेली बघायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांअगोदर ती एअरपोर्टवर आपल्या बॉयफ्रेंडसोबत दिसून आली होती. आता पुन्हा एकदा तिच्या रूमर्ड बॉयफ्रेंडबरोबर (Boyfriend) दिसून आली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


भूमी पेडणेकर गुरूवारी एकासोबत स्पॉट झाली होती. पापराजी इन्टाग्राम (Instagram) पेज विरल भयानीनं याबद्दलचा ‘तो’ व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती एका व्यक्तीबरोबर पुन्हा दिसून आली आहे. सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत आपण पाहू शकणार आहे की भुमी यावेळी एका व्यक्तीसोबत कारमध्ये बसत असल्याचे दिसत आहे. ती एका कॅफेतून यावेळी बाहेर पडत असल्याचे दिसून आली आहे. त्या व्हिडिओमधील ती व्यक्ती कोण असा प्रश्न भुमी पेडणेकरला विचारला जात आहे.

तसेच बॉयफ्रेंड असून यावेळी ती त्याच्यासोबत डेटवर गेलेली होती. ते दोघं डेटवरून घरी परतत असताना पुन्हा स्पॉट झाले आहे. यावेळी ते दोघंही कॅफेच्या बाहेर पुन्हा एकदा स्पॉट झाले आहेत. यावेळी भुमी ही डेटला जात असल्याप्रमाणे तिने आऊटफिट परिधान करून आली होती. यावेळी ती ब्लॅक रंगाचा मिनी गाऊन परिधान केल्याचे दिसून आली आहे. हा ड्रेस तिच्या पायाच्या बाजूला कट असणारा होता. सोबत तिच्या बेल्टला पोनी होता. तिच्या ड्रेसवर काही प्रमाणात डायमंड देखील चमकत होते. तिनं गळ्यात एक हलकंच लॉकेट घातल्याचे देखील दिसून आले आहे. आणि हातात बॅग घेतली असल्याचे दिसून आले आहे.

Trial Period Teaser : जेनेलिया देशमुख शोधतेय ‘फादर ऑन रेन्ट’; अनेकांचे इंटरव्ह्युही देखील घेतले

तसेच तिनं लाईट मेकअप आणि डिनर डेटला जाऊ असा मेकअप केला होता आणि केस देखील अगदी नीट बांधले होते. अगदी एखाद्या हुबेहूब बाहुलीप्रमाणेच ती यावेळी दिसून आली आहे. तिनं रेड लिपस्टिक देखील लावल्याचे दिसून आली आहे. यामुळे तिच्या या आऊटफिटवर तिनं डिनर डेटला गेली अशी चर्चा रंगलेली ब्वघ्याला मिळत आहे. यावेळी भुमी पेडणेकर ही देखील ट्रोल झाल्याचे बघायला मिळालं आहे. ती ज्या व्यक्तीसोबत स्पॉट झाली आहे. त्याने ब्लॅक रंगाचा आऊटफिट घातल्याचे दिसून आली आहे. सोबतच त्याने काळा रंगाचा चष्मा देखील घातल्याचे दिसून आला आहे.

परंतु त्याच्या या आऊटफिटने तो चांगलाच ट्रोल झाल्याचे दिसून आले आहे. यावरून भुमीला देखील सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आल्याचे दिसून आले आहे. ट्रोल करत असताना एका युझरने सांगितले आहे की, ”अरे हा बीएफ आहे की धारावीचा कोणी चरसी?” तर दुसऱ्या एकने कॉमेंट्स केली आहे की, ”काय करावे हसावे की रडावे याच्यापेक्षा दीपिक कलाल परवडला.’ तर तिसऱ्यानं लिहिलंय की, ”हा चोमू कोण आहे? अशा प्रकारे भुमी पेडणेकरला ट्रोल केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube