विनीत कुमार सिंहने चाहत्यांना दिले रिटर्न गिफ्ट, सनी देओल-स्टार ‘SDGM ” चित्रपटात दिसणार

Vineet Kumar Singh : अभिनेता विनीत कुमार सिंह (Vineet Kumar Singh) आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त अभिनेता विनीत कुमार सिंह

Vineet Kumar Singh

Vineet Kumar Singh : अभिनेता विनीत कुमार सिंह (Vineet Kumar Singh) आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त अभिनेता विनीत कुमार सिंह चाहत्यांना रिटर्न गिफ्ट दिला आहे. चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर करत त्याने ‘SDGM’ नावाचा बहु-भाषिक पॅन इंडिया चित्रपट साइन केला असल्याची माहिती दिली आहे.

या चित्रपटात विनीत कुमार सिंह यांच्यासह सनी देओल (Sunny Deol) मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Mythri Movie Makers आणि People Media Factory द्वारे निर्मित हा चित्रपट विनीतचा सनी देओलसोबतचा पहिला प्रोजेक्ट असणार आहे.

अहवालानुसार मोठ्या बजेटचा चित्रपट “देशातील सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट” म्हणून ओळखला जाणार असून तो गोपीचंद मालिनेनी दिग्दर्शित करणार आहे. या वर्षी जूनमध्ये फ्लोअरवर गेलेला हा चित्रपट अनेक यशस्वी उपक्रमांमागे असलेल्या Mythri Movie Makers आणि People Media Factory च्या प्रभावी ट्रॅक रेकॉर्डमुळे खूप अपेक्षित आहे. सनी देओल आणि ‘रंगबाज’ अभिनेता काय जादू निर्माण करणार याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vineet Kumar Singh (@vineet_ksofficial)

प्रॉडक्शनच्या जवळच्या स्त्रोतांनी अस सांगितल आहे हे दोन्ही कलाकार वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी निर्मात्यांनी रणदीप हुड्डाला चित्रपटाचा भाग म्हणून घोषित केले होते. ऋषी पंजाबी हे सिनेमॅटोग्राफी सांभाळतील तर संगीत थमन एस सैयामी खेर यांनी दिले आहे आणि रेजिना कॅसँड्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

इतकं असंवेदनशील सरकार कधीच पाहिलं नाही; भर पावसात सुप्रिया सुळे कडाडल्या..

दरम्यान, विनीत कुमार सिंहला त्याच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘घुसपैठिया’ मधील कामगिरीबद्दल प्रशंसा मिळत आहे. सध्या तो ‘सुपरबॉय ऑफ मालेगाव’, ‘रंगीन’ आणि ‘छावा’ या त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सच्या रिलीजची तयारी करत आहे.

follow us