Ghuspaithiya Movie: विनीत कुमार सिंह-स्टारर ‘घुसपैठिया’ला प्रेक्षकांची पसंती तर समीक्षकांनी केलं कौतुक

Ghuspaithiya Movie: विनीत कुमार सिंह (Vineet Kumar Singh) स्टारर 'घुसपैठिया' रिलीज झाला असून त्याने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंक

  • Written By: Published:
Ghuspaithiya Movie

Ghuspaithiya Movie: विनीत कुमार सिंह (Vineet Kumar Singh) स्टारर ‘घुसपैठिया’ (Ghuspaithiya Movie) रिलीज झाला असून त्याने प्रेक्षकांची आणि समीक्षकांची मने जिंकली आहेत. (Urvashi Rautela) विनीत यांच्या अभिनय कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणून या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.

सुसी गणेशन दिग्दर्शित हा चित्रपट आधुनिक काळातील डिजिटल धोक्यांची गुंतागुंत आणि त्याचा वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर होणाऱ्या प्रभावाचा सखोल अभ्यास करणार असून सोशल मीडियाचा (Social Media) व्यापक प्रभाव आणि त्या मागची गोष्ट यातून उलगडते. सायबर क्राईमच्या वाढत्या धोक्यावर प्रभावी भाष्य केल्याबद्दल चित्रपटाला प्रशंसा मिळत
आहे.

चित्रपटातील नायकाची भूमिका करणारा विनीत त्याच्या उत्तुंग आणि सखोल अभिनयासाठी चर्चेत आला आहे. एक अभिनेता म्हणून त्याची उल्लेखनीय अभिनय शैली ही सगळ्यांना माहीत आहे विनीत ला समीक्षकाने त्याचा कामगिरीला “शक्तिशाली” अस म्हंटल आहे तर ‘विनीत कुमार त्यांच्या भूमिकेच्या भावनिक आणि तीव्र पैलूंमध्ये अखंडपणे बदल करून कशी कमालीची कामगिरी करतोय, अस सांगितल आहे.

CTRL: अनन्या पांडेचा आगामी सिनेमा सीटीआरएल; ‘या’ तारखेला होणार OTTवर रिलीज…

दुसरीकडे प्रेक्षकांनी विनीत यांच्या भूमिकेत सत्यता आणि बारकावे आणण्याच्या क्षमतेचे कौतुक केले आहे ज्यामुळे त्यांची सर्वात अष्टपैलू अभिनेत्यांपैकी एक म्हणून प्रतिष्ठा वाढली आहे. विनीत या भूमिकेने पुन्हा चर्चेत आला आहे. चित्रपटान खूप कौतुक मिळवलं असून विनीत सिंह अनेक नवनवीन प्रकल्पांसाठी तयारी करत आहेत. तो यावर्षी ‘सुपरबॉय ऑफ मालेगाव’, ‘रंगीन’ आणि ‘छावा’ या चित्रपटात दिसणार आहे.

follow us