प्रवीण तरडे यांना यशवंतराव चव्हाण कला जीवन गौरव पुरस्कार जाहीर

प्रवीण तरडे यांना यशवंतराव चव्हाण कला जीवन गौरव पुरस्कार जाहीर

पुणे : गेली ३४ वर्ष अखंडितपणे स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट (Prakash Dhere Charitable Trust) व गंगा लॉज मित्र मंडळ पुणे यांच्यावतीने दरवर्षी यशवंतराव चव्हाण कला व साहित्य पुरस्कार दिले जातात. या वर्षीचा यशवंतराव चव्हाण कला जीवन गौरव पुरस्कार (Yashwantrao Chavan Kala Jeevan Gaurav Award) सिने दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांना जाहिर झाला आहे.

प्रवीण तरडे यांनी अनेक मालिकांसाठी पटकथा, संवाद लेखन केले आहे. कन्यादान, कुंकू, कुंटूब, पिजंर या मालिकांसाठी तरडे यांनी लेखन केलं. तर मुळशी पॅटर्न, रेगे, कोकणस्थ, देऊळबंद, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर अशा वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी कधी लेखन तर कधी दिग्दर्शन केले आहे. प्रवीण तरडे हे उत्कृष्ट अभिनेते असून त्यांनी अनेक दर्जेदार आणि रांगड्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रवीण तरडे यांना जाहीर झालेल्या यशवंतराव चव्हाण कला जीवन गौरव पुरस्कारचे स्वरूप हे रोख २५ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे आहे. यापूर्वी हा कलाक्षेत्रातील मानाचा पुरस्कार अभिनेते दिलीप प्रभावलकर, अभिनेते सचिन पिळगावकर यांना जाहीर झाला होता. १२ मार्च रोजी टिळक स्मारक मंदिराता रात्री ९ वाजता होणाऱ्या कविसंमेलनात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

कला जीवन गौरव पुरस्काराशिवाय यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कारही जाहीर करण्यात आले. यंदाच्या यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कारसाठी चार कवितासंग्रहांची निवड झाली. त्यात वेर विखेर – कवी वर्जेश ईश्वरलाल सोलंकी (वसई), घामाची ओल धरून – कवी आबा पाटील (जत), प्रश्न टांगले आभाळाला – कवी नितीन देशमुख (चांदुर बाजार), कपडे वाळत घालणारी बाई – कवयित्री हर्षदा सुंठणकर (बेळगाव) यांना साहित्य पुरस्कार जाहीर झाले. प्रत्येकी रोख ११ हजार रुपये व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्यातर्फे ३४ वर्षापासून कविसंमेलन आणि पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो. दरवर्षी प्रमाणे १२ मार्च रोजी टिळक स्मारक मंदिरात कवितांची मैफल रंगणार आहे. त्या कविसंमेलनात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

Sharad Pawar यांनी पाठिंब्यावरुन नागालँडबाबत स्पष्टच सांगितले…

या कवी संमेलनात वर्जेश सोलकी, प्रभाकर साळेगावकर, किरण येले, नितीन देशमुख, आबा पाटील, आबिद शेक, हर्षदा सुंठणकर, गजानन मते आदी कवी सहभागी होणार आहेत. या कवी संमेलनाचाचे सूत्रसंचालन कवी रामदास फुटाणे आणि अशोक नायगावकर करणार आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube