Ram Mandir Photo : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली, पाहा भव्य मंदिराचे आतील फोटो

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) उद्घाटन उद्या म्हणजेच 22 जानेवारीला होणार आहे. या राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) हस्ते होणार आहे. दरम्यान, या सोहळ्यापूर्वी राम मंदिराची काही छायाचित्रे समोर आली आहेत.

राम मंदिर उद्घाटनाच्या आणि रामल्लाच्या नवीन मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्येला 2500 क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे.

अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिराला मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट केली.

राम मंदिराच्या खांबांवरही भव्य नक्षीकाम करण्यात आले आहे. भिंती पुतळ्यांनी सजवल्या आहेत.

राम मंदिर न्यासाकडून भव्य राम मंदिराचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

राम मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील केली आहे. रात्रीच्या वेळी राम मंदिराला आकर्षक अशी ही विद्युत रोषणाई केल्यानं मंदिर परिसर उजळून निघाला आहे.

राम मंदिर लोकार्पण सोहळ्याची प्रतीक्षा अवघ्या देशाला लागून राहिली असून 23 जानेवारी पासून सर्वसामान्यांना दर्शन घेता येणार आहे.
