BJP Foundation Day : भाजपच्या दिग्गज नेत्यांनी असा साजरा केला आपला स्थापना दिवस

भारतीय जनता पक्षाचा आज स्थापना दिवस आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले आहे.

आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील आपल्या घराच्या बाहेर भाजपचा झेंडा लावला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी मुंंबईच्या कार्यालयात भाजपचा ध्वज फडकवला.

यावेळी त्यांनी भाजपचे नेते श्यामाप्रसाद मुखर्जी व दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला अभिवादन केले.

स्थापनादिनाच्या निमित्ताने भाजपने भिंतीवर पक्षाचे नाव व चिन्ह रंगवण्याचे अभियान केले.

भाजपच्या कार्यालयात सर्व नेत्यांनी एकत्र येत या कार्यक्रमात सहभाग घेतला.

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील वरळी येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी पंकजा मुंडे वरळी येथील कार्यालयाबाहेर भाजपचा झेंडा फडकावला.

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने आज प्रदेश कार्यालयात पूर्वीपासून भाजपासोबत काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला.
