Monsoon 2023 : यंदा दुष्काळ पडणार? हवामान खात्याने मान्सूनबाबत अंदाज केला जारी

राजधानी मुंबईसह राज्यातअवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर आता उन्हाचा कडाका वाढला आहे. दरम्यान, हवामान खात्याने मान्सूनबाबत अंदाज जारी केला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) यावर्षी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

महाराष्ट्र व तामिळनाडूत मुसळधार पावसाचा इशारा; हवामानात होणार पुन्हा बदल

विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून सामान्य राहण्याची 67 टक्के शक्यता आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रविचंद्रन यांनी सांगितले की, भारतात जून ते सप्टेंबर या हंगामात सामान्य पाऊस पडेल.

आयएमडीने वेगवेगळ्या मॉडेल्सच्या आधारे मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे.
