आशिया खंडातील सर्वात मोठ्या बोगद्याची गडकरींकडून पाहणी, पहा फोटो

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जम्मू- काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्यासह काश्मीरमधील सोनमर्ग येथील झोजिला बोगद्याची पाहणी केली.

दरवर्षी बर्फवृष्टी झाल्याने श्रीनगर-लडाख हा रस्ता बंद होतो. त्यामुळे तिथे राहणारे नागरिक व लष्कराला देखील त्रास होतो.

या बोगद्याचे काम पूर्ण झाल्याने सोनमर्ग येथील विकासाला चालना मिळेल.

झोजिला आणि झेड मॉड बोगदा लेह-लडाख व जम्मू काश्मीरच्या भविष्यात मोठे योगदान देणार आहे.

या बोगद्यामुळे सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे.

हा बोगदा आशिया खंडातील सर्वात लांब 13.4 किमी लांबीचा बोगदा आहे.

जम्मू-काश्मीर येथे भूस्खलनामुळे वारंवार रस्ता बंद होतो. त्यामुळे 25 हजार कोटी रुपये खर्च करुन 19 बोगदे बांधले जात आहेत.

जोजिला परिसर हा दुर्गम असून याठिकाणा वारंवार अपघात होत असतात.

या टनेलमुळे काश्मीर व लदाखमध्ये बारा महीने संपर्क राहणार आहे.
