फिलिपाईन्समध्ये 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; पत्त्यांप्रमाणे कोसळल्या शाळा अन् इमारती

earthquake hits Philippines आज सोमवार 8 जून सकाळी फिलिपाइन्समध्ये 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने मोठी खळबळ उडाली.

Earthquake Hits Philippines

7.8 magnitude earthquake hits Philippines; Schools and buildings collapse :  आज सोमवार 8 जून सकाळी फिलिपाइन्समध्ये 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने मोठी खळबळ उडाली. देशाच्या दक्षिण भागात झालेल्या या भूकंपामुळे काही क्षणांतच इमारती हादरू लागल्या, भिंतींना तडे गेले आणि अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या. एका शाळेच्या इमारतीलाही या भूकंपाचा फटका बसला. भूकंपानंतरचे विध्वंसक दृश्य अत्यंत भयावह होते. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या दुर्घटनेत किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे. भूकंपाची तीव्रता इतकी मोठी होती की शेजारील देशांनाही सुनामीचा इशारा देण्यात आला आणि संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले.

नेमकं काय घडलं?

अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या (USGS) माहितीनुसार, सोमवारी फिलिपाइन्सच्या दक्षिणेकडील मिंडानाओ प्रदेशात 7.8 तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर फिलिपाइन्ससह इंडोनेशिया आणि जपानमध्ये सुनामीचा इशारा जारी करण्यात आला. एपीच्या वृत्तानुसार, फिलिपाइन्समध्ये सुमारे तीन फूट उंचीच्या सुनामी लाटा उसळल्या. तर इंडोनेशियातील किमान नऊ ठिकाणी छोट्या सुनामी लाटांची नोंद झाली. त्यापैकी सांगिहे बेटावर 0.75 मीटर उंचीची सर्वाधिक लाट नोंदविण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर इंडोनेशियाने सुनामीचा इशारा मागे घेतला.

इराण-इस्रायल संघर्षाची झळ भारतीय शेअर बाजाराला; सेन्सेक्स 821 अंकांनी कोसळला, निफ्टीतही मोठी घसरण

जनरल सँटोस शहरातून समोर आलेल्या छायाचित्रे आणि व्हिडीओंमध्ये अनेक दुकाने आणि इमारती अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, ज्या दिवशी सरकारी शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत होती, त्याच दिवशी हा भूकंप झाला. मिंडानाओमधील एका शाळेची इमारतही कोसळली. मात्र, भूकंपावेळी विद्यार्थ्यांना कोणतीही इजा झाली नाही. शाळा आधीच रिकामी करण्यात आली होती.

खाकीचा दरारा वापरून डॉक्टरांची वेळ मिळवण्याचा प्रयत्न; पुण्यात बनावट महिला पोलीस अधिकाऱ्याला अटक

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये प्राथमिक शाळेतील अनेक विद्यार्थी भीतीने थरथरत मैदानात बसलेले दिसत आहेत, तर त्यांच्या पायाखालची जमीन जोरदार हादरत होती. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये दावाओ डेल सुर येथील एका माध्यमिक शाळेचे छप्पर विद्यार्थ्यांची मैदानात रांग सुरू असतानाच कोसळल्याचे दिसून आले. सुदैवाने, या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची माहिती नाही.

इराण आणि हिजबुल्लाहचा इस्रायलवर संयुक्त हल्ला; सायरनने दणाणली शहरे, पलटवाराची इस्रायलची तयारी

फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी सर्व संबंधित सरकारी यंत्रणांना तातडीने मदत व बचावकार्य सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी प्रभावित भागातील नागरिकांना सुनामीच्या इशाऱ्याकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन करत, “तत्काळ उंच ठिकाणी जा, वाट पाहू नका. तुमचा जीव सर्वांत महत्त्वाचा आहे,” असे म्हटले.

राज्यात मान्सूनची धडक, 25 जिल्ह्यांवर यलो अलर्टचे सावट; हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

सारंगानी प्रांतातून सर्वाधिक नुकसानीची छायाचित्रे समोर आली आहेत. सुमारे 5 लाख 80 हजार लोकसंख्या असलेल्या या भागात मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भूकंपानंतर येथील पोलीस मुख्यालयाच्या इमारतीलाही तडे गेले. ध्वजारोहण सुरू असतानाच हा जोरदार धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे.

follow us