‘भलेही आम्ही लहान, पण कोणीही आम्हाला…’; चीनच्या दौऱ्यानंतर मालदीने वटारले भारताकडे डोळे

  • Written By: Published:
‘भलेही आम्ही लहान, पण कोणीही आम्हाला…’; चीनच्या दौऱ्यानंतर मालदीने वटारले भारताकडे डोळे

Mohammed Muizzoo : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केल्याप्रकरणी भारत आणि मालदीवमध्ये सध्या तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (Mohammed Muizzoo) यांना सूर बदलला आहे. नुकतंच त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. विशेष म्हणजे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावरून परतलेल्या मुइज्जू यांनी भारतावर निशाणा साधला आहे. कोणत्याही देशाला आम्हाला धमकावण्याचा अधिकार नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

Chhagan Bhujbal ओबीसी आरक्षणाचे श्रीकृष्ण, शकुनीला चिलटासारखं चिरडणार; पडळकरांचा जरांगेंवर थेट हल्ला 

पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपचा दौरा केला होता. या दौऱ्यानंतर त्यांनी X वर पोस्ट करून लोकांना लक्षद्वीपमध्ये पर्यटनासाठी येण्याचे आवाहन केले. पण, मालदीवच्या तीन उपमंत्र्यांनी या दौऱ्यावरून मोदींवर निशाणा साधला. मोदी आणि भारतीय नागरिकांबद्दल केलेल्या अपमानास्पद टिप्पणीनंतर भारतातून मालदीवची पर्यटन कोंडी करण्यात आली. मालदीवच्या मंत्र्यांच्या टिप्पणीनंतर भारतीय पर्यटक आणि टूर कंपन्यांनी त्यांचा मालदीव दौरा रद्द केला आहे. यामुळे मालदीवच्या पर्यटन क्षेत्राचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

लोकसभेची मोर्चेबांधणी! नगरमध्ये उद्या महायुतीचा मेळावा, नेत्यांनी लोकसभेसाठी फुंकले रणशिंग 

भारताने मालदीवच्या टीकेवर आक्षेप घेतला होता. भारताच्या कडक इशाऱ्यानंतर मालदीव सरकारने काहीशी माघार घेतली. मालदीव सरकारने आपल्या तीन उपमंत्र्यांना निलंबित केले होते. मात्र, आता मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी आपला मोर्चा चीनकडे वळवला. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष नुकतेच पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावरून परतले आहेत. या चीन भेटीदरम्यान त्यांनी चीन सरकारला पर्यटकांना मालदीवमध्ये पाठवण्याची विनंती केली.

दरम्यान, चीनमधून मायदेशी परतल्यानंतर मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला अप्रत्यक्ष इशारा देण्याचा प्रयत्न केला आहे. मुइज्जू म्हणाले, भलेही आम्ही लहान देश असू शकतो, असं असलं म्हणून कोणालाही आम्हाला धमकावण्याचा, दाबण्याचा परवाना मिळाला नाही. मुइज्जू यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्याचा रोख भारताकडे असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुइज्जू हे चिनी धार्जीणे आहेत. नुकतेच ते चीनला गेले होते. यावेळी त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. एकीकडे भारतासोबतचे संबंध ताणले गेले असताना मुइझ्झू यांच्या चीन भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube