Assembly Elections : नागालँड, मेघालय आणि त्रिपुरातील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं
नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने नागालँड, मेघालय आणि त्रिपुरातील विधानसभेच्या निवडणुकांच बिगुल वाजलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ईशान्येकडील तीन राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्रिपुरामध्ये १६ फेब्रुवारीला आणि नागालँड-मेघालयात २७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर 2 मार्च रोजी तिन्ही राज्यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
नागालँड, मेघालय आणि त्रिपुराच्या विधानसभांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १२ मार्च, १५ मार्च आणि २२ मार्च रोजी संपेल आणि त्याआधी नवीन विधानसभा स्थापन करायच्या आहेत.
नागालँड, मेघालय आणि त्रिपुरा येथे एकूण ६२.८ लाख मतदार आहेत. ज्यात ३१.४७ लाख महिला मतदार, ९७,००० मतदार ८० वर्षांवरील आणि ३१,७०० अपंग मतदार आहेत. असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. 3 राज्यांतील निवडणुकीत १.७६ लाखांहून अधिक मतदार प्रथम मतदान करणार आहेत.