मेहुल चोक्सीला मोठा धक्का! बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, भारतात आणण्याचा मार्ग मोकळा

Mehul Choksi : गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला मोठा धक्का बसला आहे. बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाने

  • Written By: Published:
Mehul Choksi

Mehul Choksi : गेल्या अनेक वर्षांपासून फरार असलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला मोठा धक्का बसला आहे. बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या भारतात प्रत्यार्पणाला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता त्याला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, 13,000 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी चोक्सी भारतात त्याच्या प्रत्यार्पणाला आव्हान देत होता मात्र बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयाने, कोर्ट ऑफ कॅसेशनने मंगळवारी याचिका फेटाळून त्याला मोठा धक्का दिला आहे.

कोर्ट ऑफ कॅसेशनचे प्रवक्ते हेन्री व्हँडरलिंडेन म्हणाले, कोर्ट ऑफ कॅसेशनने (Belgium Supreme Court) अपील फेटाळले. त्यामुळे, कोर्ट ऑफ कॅसेशनचा निर्णय कायम आहे. अँटवर्प कोर्ट ऑफ कॅसेशनने मेहुल चोक्सीची (Mehul Choksi) भारताला प्रत्यार्पणाची विनंती सुसंगत आणि लागू असल्याचे ठरवत पूर्वीचा निर्णय कायम ठेवला होता. 29 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा न्यायालयाच्या प्री-ट्रायल चेंबरने जारी केलेल्या आदेशांची पुनरावलोकन करण्यात चार सदस्यीय कोर्ट ऑफ कॅसेशनला कोणतीही त्रुटी आढळली नाही.

जिल्हा न्यायालयाने मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली, असे ठरवून की मे 2018 आणि जून 2021 मध्ये मुंबई विशेष न्यायालयाने जारी केलेले अटक वॉरंट वैध होते. अपील न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले की, 13,000 कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी चोक्सीला भारतात प्रत्यार्पण केल्यास निष्पक्ष खटला नाकारला जाण्याचा किंवा कोणत्याही गैरवापराला सामोरे जाण्याचा धोका नाही असं कोर्ट ऑफ कॅसेशनचे प्रवक्ते हेन्री व्हँडरलिंडेन म्हणाले.

आर्थिक नुकसान अन् मालमत्ता खरेदीस येणार अडचण; जाणून घ्या ‘या’ राशींसाठी 10 डिसेंबर कसा राहील?

follow us