पाकिस्तान हादरला! बलुचिस्तानातील स्फोटात आठ जणांचा मृत्यू; अनेक जखमी

पाकिस्तान हादरला! बलुचिस्तानातील स्फोटात आठ जणांचा मृत्यू; अनेक जखमी

Blast in Balochistan : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात शनिवारी सायंकाळी धावत्या बसमध्ये भीषण स्फोट झाला. या आत्मघाती हल्ल्यात एक प्रवासी वाहन आणि पोलीस वाहनाचे मोठे नुकसान झाले. IANS वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या स्फोटात आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर 40 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यात जवान मोठ्या संख्येने आहेत. या हल्ल्याने भारतात झालेल्या पुलवामा हल्ल्याची आठवण करून दिली. भारतात 2019 मध्ये जम्मू काश्मीरमधील पुलवामात दहशतवाद्यांनी विस्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफ जवानांच्या वाहनाला धडकवली होती.

पाकिस्तानातील वृत्तपत्र द डॉननुसार, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. बलुचिस्तान पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क अधिकारी राबिया तारिक यांनी सांगितले की सुरुवातीच्या माहितीनुसार बस कराची येथून तुर्बतकडे निघाली होती. न्यू बहमन भागात या बसला टार्गेट करण्यात आलं. या घटनेनंतर सुरक्षा दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे.

पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच हिंदू पोलिस अधिकारी; राजेंद्र मेघवार यांनी रचला इतिहास

क्वेटाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक देखील आपल्या कुटुंबासमवेत तुर्बतला चालले होते. बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी म्हटले, की या हल्ल्यात एसएसपी मोहसिन आणि त्यांच्या कुटुंबातील चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. बलुचिस्तान प्रांताचे मुख्यमंत्री मीर सरफराज बुगती यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.

पाकिस्तानात बीएलएकडून सातत्याने हल्ले होत आहेत. जियो न्यूजच्या रिपोर्टमध्ये सुरक्षा सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले की मागील एक वर्षात बीएलएच्या हल्ल्यांत शंभर पेक्षा जास्त नागरिक ठार झाले आहेत. मागील महिन्यात तु्र्बतमधील दश्त भागात झालेल्या स्फोटांत दोन लोकांचा मृत्यू झाला होता. चार जण जखमी झाले होते. अफगाणिस्तानात तालिबान सरकारची वापसी झाल्यानंतर पाकिस्तानात हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

पाकिस्तान घाबरला, चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलवरच, जाणून घ्या बैठकीत ठरलं तरी काय? 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube