पाकिस्तान घाबरला, चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलवरच, जाणून घ्या बैठकीत ठरलं तरी काय? 

  • Written By: Published:
पाकिस्तान घाबरला, चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलवरच, जाणून घ्या बैठकीत ठरलं तरी काय? 

Champions Trophy 2025 :  बीसीसीआय आणि केंद्र सरकारने (Central Government) भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Champions Trophy 2025) पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे सांगितल्या नंतर आता पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलवर (Hybrid Model) करण्यास तयार झाला आहे. मात्र त्यांनी आयसीसी (ICC) समोर तीन अटीही ठेवले आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलवर होणार की नाही यासाठी आज आयसीसीकडून ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत  चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलवर घेण्यासाठी पाकिस्तानने सहमती दर्शवली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यासाठी पाकिस्तान बोर्डाला वार्षिक महसूलमध्ये मोठा वाटा हवा आहे. तर दुसरीकडे पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी (Mohsin Naqvi) म्हणाले की, पाकिस्तान देखील भारतात खेळायला जाणार नाही.

आयसीसी समोर अट

भारतीय संघाचे सर्व सामने दुबईमध्ये असावेत

ग्रुप स्टेज आणि जर सेमीफायनल आणि फायनलसाठी भारतीय संघ पात्र ठरले तर भारताचे सर्व सामने दुबईमध्ये (UAE) आयोजित करण्यात यावे अशी मागणी पाकिस्तानने आयसीसी समोर केली आहे.

लाहोरमध्ये बॅकअप होस्टिंग

जर भारतीय या स्पर्धेतून  ग्रुप स्टेजमधून आऊट झाला तर लाहोरमध्ये सेमीफायनल आणि फायनल मॅचेस आयोजित करण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी देखील पाकिस्तानने केली आहे.

पाकिस्तान भारतात खेळणार नाही

भविष्यात जर आयसीसीने भारतात कोणत्याही स्पर्धेचे आयोजन केल्यास पाकिस्तान संघ भारतात खेळणार नाही. पाकिस्तानसाठी देखील हायब्रिड मॉडेलवर स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी पाकिस्तानकडून करण्यात आली आहे.

बीसीसीआय आणि पीसीबीच्या वादामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर होण्यास विलंब झाला आहे. माहितीनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे मात्र या स्पर्धेसाठी आतापर्यंत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र आता पाकिस्तानने हायब्रीड मॉडेल स्वीकारल्याने पुढील काही दिवसात या स्पर्धेसाठी वेळापत्रक जाहीर करण्यात येऊ शकते. गेल्या काही दिवसांपासून  चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे.

अंडर-19 आशिया चषकात भारताला धक्का, हाय व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानकडून 44 धावांनी पराभव

तर दुसरीकडे आयसीसीकडून 2031 पर्यंत भारतात  तीन आयसीसी स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामध्ये श्रीलंकेसोबत संयुक्तपणे T20 विश्वचषक 2026 मध्ये,  चॅम्पियन्स ट्रॉफी 2029 मध्ये , बांगलादेशसोबत संयुक्तपणे एकदिवसीय विश्वचषक 2031 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तर महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 मध्ये भारतात होणार आहे. त्यामुळे पाकिस्तान काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube