Dominic Raab : ब्रिटनचे उपपंतप्रधान डॉमिनिक राब यांचा राजीनामा…

Dominic Raab : ब्रिटनचे उपपंतप्रधान डॉमिनिक राब यांचा राजीनामा…

ब्रिटनचे उपपंतप्रधान आणि न्यायमंत्री डॉमिनिक राब यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गैरव्यवहाराचे आरोप होत असल्याने त्यांना ही निर्णय घेतला आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांना ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या पत्रात राब म्हणाले की, या तपासाने एक धोकादायक उदाहरण ठेवले आहे परंतु ते सरकारला पाठिंबा देत राहतील.

राब यांच्यावर व्हाईटहॉलमधील न्याय मंत्रालय आणि इतर विभागांमध्ये धमकावल्याचा आरोप होता. त्यांनंतर त्यांनी राजीनामा दिला आहे.

राब म्हणाले की, मी तपास करण्याची मागणी आणि राजीनामा देण्याचं वचन दिलं होतं. जर यामध्ये कोणत्याही प्रकारच्या धमकीबाबत उघड झाल्यास माझ्यासाठी माझं वचन महत्वाचं असल्याच त्यांनी म्हंटलंय.

…तेव्हा चंद्रकांत पाटलांनी हात वर केले, आज त्याच हाताने गुंड शरद मोहोळच्या पत्नीला दिला पक्षात प्रवेश

तपासामध्ये एक अजेंडा कायम ठेवण्यात आला आहे. हाच अजेंडा मंत्र्यांविरोधातल्या चुकीच्या तक्रारींना प्रोत्साहित करेल आणि सरकारच्यावतीने परिवर्तन घडवून आणणाऱ्यांवर चुकीचा प्रभाव पडणार असल्याचं भाकीतंही त्यांनी केलं आहे. राब यांचा राजीनामा म्हणजे ऑक्टोबरमध्ये सुनक यांनी डाऊनिंग स्ट्रीटमध्ये प्रवेश केल्यापासून वैयक्तिक वागणुकीवरुन पायउतार होणारे तिसरे ज्येष्ठ मंत्री आहेत. ऋषी सुनक यांनी प्रामाणिकपणे सरकार चालवण्याचे आश्वासन दिले होते.

Maharashtra Congress : नाना पटोले जाणार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याची नवी चर्चा

गुंडगिरीच्या आरोपांनंतर युकेचे उपपंतप्रधान डॉमिनिक राब यांनी राजीनामा दिला. उपपंतप्रधान राब यांच्यावर गुंडगिरीचे आरोप झाल्यानंतर त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावत तत्काळ आपल्या उपपंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.

उपपंतप्रधान राब म्हणाले, मी आपल्या कोणत्याही कर्मचाऱ्याचा अवमान केला नसून चौकशी जो काही निकाल देईल, त्यास मी बांधील असल्याचं राब यांनी स्पष्ट केलंय. राब यांनी याआधीच माझ्यावर गुंडगिरीचे आरोप झाल्यास राजीनामा देणार असल्याचे संकेत दिले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube